Pollution due to burning of garbage at Kukane. 
अहिल्यानगर

धुराने गुदमरतोय कुकाणेकरांचा श्वास ! घंटागाडी दारोदारी, तरी जळतो कचरा रस्त्यावरी

सुनील गर्जे

कुकाणे (अहमदनगर) : कचरा उचलण्यासाठी घंटागाडी घरोघरी जाते, तरीही नेवासे-शेवगाव मुख्य रस्त्यासह सर्वच अंतर्गत रस्ते व चौकांत कचरा सर्रास पेटविला जातो. वायुप्रदूषण वाढले असून, श्वसनविकारांत वाढ होत आहे. कचरा जाळल्याने होणारे प्रदूषण, धूर व वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या कचऱ्याच्या राखेने कुकाणेकरांचा श्वास गुदमरला आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
कुकाण्याची मुख्य बाजारपेठ नेवासे-शेवगाव रस्त्यावर वसली आहे. प्लास्टिक पिशव्या, कागद, पुठ्ठे, भंगारात आलेल्या तारा यांसह दिवसभरातील कचरा रस्त्यालगतचे काही व्यावसायिक रोज सायंकाळी किंवा रात्री दुकानासमोर रस्त्यावरच जाळतात. त्यामुळे रात्री कुकाण्यासह परिसर धुराने व्यापतो. यातून अनेकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो. लहान मुले, वृद्ध, तसेच गर्भवतींचे आरोग्य यामुळे धोक्‍यात आले आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. जाळून कचऱ्याची ज्या दुकानांसमोर विल्हेवाट लावली जाते, किंवा ज्या ठिकाणी राख दिसत असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्‍यक आहे. 
 
या आजारांना निमंत्रण !

जळालेल्या कचऱ्यातून विषारी वायू व धूर वातावरणात पसरतो. त्यामुळे कर्करोग, यकृताचे आजार, मेंदूविकार, अस्थमा होण्याची दाट शक्‍यता असते. फोम जाळल्याने निर्माण होणाऱ्या स्टायरीन वायूमुळे फुफ्फुसांसह त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे असा त्रास होतो. विशेषत: गर्भवती महिला, वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत असल्याचे कुकाण्यातील डॉ. कुलदीप पवार यांनी सांगितले. 
 


घंटागाडी गल्लोगल्ली येऊनही त्यात न टाकता कचरा जाळण्याचे प्रकार होतात. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. त्या-त्या परिसरातील नागरिकांनीही जागरूक पणे हे थांबविले पाहिजे. 
- राजेंद्र म्हस्के, ग्रामस्थ, कुकाणे 

'व्यावसायिक व नागरिकांनी कचरा साठवून तो घंटागाडीत टाकून सहकार्य करावे. घंटागाडीबाबत काही तक्रार असल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. 
- सुभाष गर्जे, ग्रामविकास अधिकारी, कुकाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT