farmer esakal
अहिल्यानगर

नगरमध्ये शेतकरी हवालदिल; कंटाळून डाळिंबबागांवर कुऱ्हाडी

शांताराम जाधव

बोटा (जि.अहमदनगर) : मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील विविध गावांमध्ये डाळिंबाच्या पिकावर तेल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या रोगांपासून बचाव करून डाळिंबे बाजारात नेल्यावर त्यांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या बागांवर कुऱ्हाडी चालविण्यास सुरवात केली आहे. (pomegranate-farm-destroyed-by-farmer-marathi-news-jpd93)

डाळिंबबागांवर शेतकऱ्याकडून कुऱ्हाडी

संगमनेर तालुक्यात सहा हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात डाळिंबबागांची लागवड आहे. बदलणारे हवामान, पावसाची अनिश्‍चितता व विविध रोगांमुळे डाळिंबउत्पादक हवालदिल झाले आहेत. दहा दिवसांपूर्वी तेल्या रोगाला कंटाळून आंबी खालसा येथील डाळिंबउत्पादक महेंद्र घगे यांनी अडीच एकर डाळिंबबागेवर कुऱ्हाड चालवली. तसेच, बोरबन येथील सावळेराम गाडेकर यांनीही डाळिंबास अपेक्षित बाजारभाव व सोबतीला रोगांचा प्रादुर्भाव, अशा संकटांना कंटाळून डाळिंबांच्या २५० झाडांवर कोयता चालविला. पठार भागातील घारगाव, बोटा, तांगडी, बोरबन, अकलापूर, कोठे बुद्रुक, आंबीखालसा, केळेवाडी या गावांचे चाळीस टक्के क्षेत्र डाळिंबबागांनी व्यापले आहे. लागवड ते फळकाढणीपर्यंत एकरी ८० हजार रुपये खर्च येतो. त्यात खुरपणी, छाटणी, सेटिंग, फळांना आवरण, मजुरी यासाठी ४० हजारांपर्यंत खर्च येतो. हा केलेला खर्चही सध्या निघत नाही. त्यामुळे बागांवर कुऱ्हाडी चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

सध्या पठार भागातील डाळिंबबागांवर मोठ्या प्रमाणात तेल्यासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशा परिस्थितीत बागा वाचविणे अशक्य होत आहे. झाडांवर कोयता चालविणे हा नाइलाजाने घेतलेला निर्णय आहे. - सावळेराम गाडेकर, डाळिंबउत्पादक, बोरबन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

Prashant Kishor Challenges BJP : प्रशांत किशोर यांचं भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान; म्हणाले, ''हिंमत असेल तर...''

Latest Marathi News Live Update : परतीच्या पावसाचा डबल धक्का! पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा कांदा पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइनला पावसाचा फटका! मुंबई-पुणे प्रवासाचा ‘एक्सप्रेस’ स्वप्नाला धक्का; मिसिंग लिंक उशिरा पूर्ण होणार

Rahul Gandhi Reaction : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप ; भाजप सरकावर मोठा आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT