Pooja Varade sakal
अहिल्यानगर

Pooja Varade : दुखापतीमुळे करिअर बदलले; मैदानाच्या ट्रॅकवरून थेट पोलिस उपनिरीक्षकपदी

क्रीडा कोट्यातून पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मी खेळामुळेच पोहोचू शकले, असे आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - शाळेत असताना मुला-मुलींना खो-खो चा सराव करताना दररोज पहायचे त्यातूनच मला खो-खो ची आवड निर्माण झाली. खो-खो तील धावण्याची चुणूक पाहून प्रशिक्षकांनी मला ॲथलेटिक्समध्ये येण्याचा सल्ला दिला. सातवीपासून नियमितपणे धावण्याचा सराव करू लागले. पुढे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत गेले आणि पदके मिळवत गेले. क्रीडा कोट्यातून पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मी खेळामुळेच पोहोचू शकले, असे आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने सांगितले.

पूजाचे बारावीपर्यंतचे शिक्षण भिंगार हायस्कूलमध्ये, तर एमएपर्यंतचे शिक्षण न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजमधून झाले. धावण्याचा सराव करताना प्रशिक्षक रमेश वाघमारे पहाटे साडेचारला यायचे, आम्ही चांदबिबी महल, मिरावली पहाड येथे सरावासाठी जायचो. पारनेर येथील मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमधून पहिली आलेच, पण मुलांमधून सुद्धा पहिली होते. हे पाहून पद्मश्री अण्णा हजारे यांनी मला भिंगार एक्स्प्रेस हे नाव दिले.

माझी पहिली शालेय राष्ट्रीय स्पर्धा मलबार हिल झाली. तेथे तीन हजार मीटरमध्ये सुवर्ण आणि १५०० मीटरमध्ये रौप्यपदक पटकाविले. भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा हिच्या विक्रमावर विद्यार्थिनीने मात केली होती. या स्पर्धेमुळे माझी इंडिया कॅम्प बंगळूर येथे निवड झाली. तेथे भारतातील दिग्गज धावपटूंबरोबर सराव करण्याची संधी मिळाली. रशियन प्रशिक्षक डॉ. निकोलाय यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला, तेथूनच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केले.

जमशेदपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत तीन हजार मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण मिळवले, तेथून माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा यूथ कॉमनवेल्थ गेम्स पुणे येथे निवड झाली. त्यावेळी भारतीय चमूतील सर्वात लहान खेळाडू होण्याचा मान मला मिळाला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळू शकतो, असा आत्मविश्‍वास स्पर्धेतून मला मिळाला. पुढच्याच वर्षी एशियन गेम्स सिंगापूर येथे १५०० मीटरमध्ये ब्राँझपदक मिळवले.

त्यानंतर सिंगापूर येथेच दोन हजार मीटरमध्ये ब्राँझपदक पटकाविले. तेथूनच जागतिक ॲथलेटिक स्पर्धा पॅरिस येथे निवड झाली. ऑल इंडिया नॅशनल युनिव्हर्सिटी स्पर्धेत १० हजार मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. जागतिक विद्यापीठ स्पर्धा रशिया येथे निवड झाली.

न खचता लढत राहिले...

२०१७ नंतर दुखापतीमुळे खेळातून ब्रेक घ्यावा लागला, त्यानंतर स्पर्धा परीक्षा द्यायचे ठरवले, माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते, सतत खेळाकडे कल असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. या कठीण काळात आई-बाबा, मोठा भाऊ कौस्तुभ पाठीशी खंबीर उभे होते. कौस्तुभने बेसिकपासून माझ्याकडून अभ्यास करून घेतला. आत्मविश्‍वास दिला की, मी हे करू शकते.

२०१९ मध्ये पहिली परीक्षा दिली. थोडक्यात माझी संधी हुकली. २०२० मध्ये ही संधी हुकली. हार न मानता २०२१ ला आत्मविश्‍वासाने परीक्षा दिली. मैदानी, शारीरिक चाचणीसह चारही टप्पे यशस्वी पूर्ण करून माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. यापुढेही पोलिस विभागातून जागतिक स्पर्धा खेळण्याचा मानस आहे.

पदकांची कमाई राष्ट्रीय पातळीवर

सुवर्ण.... ३५

रौप्य.... १४

ब्राँझ.... १२

एकूण पदके

सुवर्ण.... ३५

रोप्य.... १४

ब्राँझ.... १२

आंतरराष्ट्रीय स्पर्धा....५

राष्ट्रीय विक्रम.... ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT