Possibility of bursting of dam in Sangamner taluka due to rains 
अहिल्यानगर

३० फूट उंचीच्या बंधाऱ्याची भिंत ढासळायला लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन...

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याल्या गावाने लोकसहभागातून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्याची भिंत अतिवृष्टीमुळे ढासळण्यास सुरवात झाली आहे. 

संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावाच्या हद्दीत मोठेबाबा वाडी परिसरात, कऱ्हे घाटातील खंडोबा मंदिराच्या परिसरातील सखाहरी गुळवे यांच्या खासगी क्षेत्रातील जमीनीवर सुमारे 60 ते 70 वर्षांपूर्वी मातीचा साठवण बंधारा बांधला होता. मागील वर्षी पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेच्या निमित्ताने, ग्रामस्थांनी लोकसहभागातून श्रमदान करुन या बंधाऱ्याची उंच वाढवली होती. बंधाऱ्याच्या सुमारे 30 फुट उंचीच्या मातीच्या भिंतीची लांबी सुमारे 182 फुट आहे. सुमारे 20 एकर क्षेत्रात या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा विस्तार झाला आहे.

शुक्रवारी तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीचा परिणाम म्हणून या बंधाऱ्यात एकाएकी मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला. मात्र पावसामुळे बंधाऱ्याच्या मातीच्या भिंतीला बाहेरच्या बाजूला भगदाड पडण्यास सुरवात झाली आहे. ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती प्रशासनाला दिली मात्र त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने, ग्रामस्थांनी जेसीबीने बंधाऱ्याच्या सांडीमध्ये चर खोदून पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाणी कमी होण्याबरोबर साठलेले पाणी वाया जाणार असल्याने, ग्रामस्थांनी पोकलेन व इतर सामुग्रीनिशी बंधाऱ्याचे भगदाड बुजवण्याच्या कामाला सुरवात केली आहे.

या बंधाऱ्याला गळती लागून फुटल्यास ओढ्यातून खाली वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे तीन किलोमीटरपर्यंतच्या शेतकऱ्यांची पिके, शेतजमिन, गोठे, रहिवाशी घरे यांनी हानी होण्याची शक्यता आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी वळणाचे वर्ष! निवडणूक रणशिंग, राजकीय समीकरणांची उलथापालथ आणि विकासकामांचा वेग

January 2026 Planetary Transit: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भव्य ग्रहसंयोग! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव

KDMC Election: केडीएमसी निवडणुकीत भाजपचा विजयरथ सुरू; तिसऱ्या उमेदवाराची बिनविरोध निवड, जाणून घ्या नावे

Viral: व्हायरल ठरणारी जपानी हेअर वॉशिंग मेथड नेमकी काय? केसांच्या आरोग्यासाठी कितपत फायदेशीर जाणून घ्या

Tractor JCB Fraud : कळंबमध्ये ट्रॅक्टर–जेसीबी घोटाळा उघड; भाड्याच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; पाच आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT