Covid testing hinders Rahuri 
अहिल्यानगर

कोविड टेस्टिंग प्रयोगशाळेला टाळे, एकमेव कर्मचाऱ्याची बदली

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्‍यात काल विक्रमी 25 कोरोनाबाधितांची भर पडली. मागील 15 दिवसांत तब्बल 74 कोरोनाबाधित आढळले आहेत. अशा वेळी कोविड चाचण्या करणाऱ्या एकमेव कर्मचाऱ्याची आजपासून (मंगळवार) नगर येथे बदली झाली. त्यामुळे कर्मचाऱ्याअभावी शासनाची मोफत कोरोना चाचणी सेवा खंडित होऊन, प्रयोगशाळेला टाळे लागणार आहे. 

राहुरीतील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सुभाष मोरे शासनाच्या मोफत कोरोना चाचणी प्रयोगशाळेत कार्यरत होते. रोज 50 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी उद्यापासून (मंगळवार) नगर येथे जिल्हा रुग्णालयात हजर होण्याचा आदेश बजावला.

कोरोना चाचणी प्रयोगशाळेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना शासनाने पूर्वीच सेवेतून दूर केले आहे. राहुरीतील प्रयोगशाळा सहायक सौरभ वाल्मीक यांना पूर्वीच नगर येथे, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्ञानेश्वर इघे यांना साकूर येथे वर्ग केले आहे. एकमेव राहिलेले मोरे यांनाही नगरला बोलाविल्याने राहुरीतील कोरोना चाचण्या बंद पडणार आहेत. 

तहसीलदार फसियोद्दीन शेख म्हणाले, ""राहुरीतील कोरोना चाचण्या बंद पडू नयेत, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याशी उद्या (मंगळवारी) बोलणार आहे. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मोरे यांची नगरला बदली झाल्याचे माहिती नव्हते.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

Free Registration of 50 Lakh Rural Properties: पंतप्रधानांच्या वाढदिवशी 'स्वामित्व योजने'ने गावकऱ्यांना दिला मालकी हक्क! ५० लाख ग्रामीण संपत्तींची मोफत रजिस्ट्री

SCROLL FOR NEXT