The post of Sarpanch has been vacant for the last 14 months in Shrigonde taluka.jpg 
अहिल्यानगर

गावचा कारभार राम भरोसे! 14 महिने सरपंच नाही तर पोलिस पाटील पद 10 वर्षांपासून रिक्त

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍याची आर्थिक राजधानी, अशी ओळख असलेल्या काष्टी गावावर प्रशासनाची अवकृपा सुरू आहे. मागील 14 महिन्यांपासून येथील सरपंचपद रिक्त आहे. कोतवाल, पोलिस पाटलांच्या जागा तर 10 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही भरलेल्या नाहीत. विशेषत: पंचायत समिती सदस्यही अपात्र ठरल्याने, काष्टीबाबत 'ना' चा पाढा सुरू असल्याचेच दिसते. या पदाअभावी काष्टीकरांना रोजच अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

आमदार बबनराव पाचपुते यांचे गाव म्हणून काष्टीची राज्यभर ओळख आहे. येथील जनावरांच्या आठवडे बाजारात राज्यासह परराज्यांतून व्यापारी-शेतकरी येतात. तेथील सहकारी सेवा संस्था तर आशिया खंडात गाजली आहे. तालुक्‍याचे अर्थकारण, राजकारण याच गावातून अनेक वर्षांपासून फिरत आले आहे. 

काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक चार वर्षांपूर्वी झाली. जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने लोकनियुक्त सरपंच सुलोचना वाघ यांना अपात्र ठरविले गेले. गेले 14 महिने गावाला सरपंच नाहीत. आता नवा सरपंच जनतेतून नव्हे, तर ग्रामपंचायत सदस्यांमधूनच निवडला जाणार आहे. मात्र, अजून तरी त्यालाही मुहूर्त मिळालेला नाही. शिवाय, त्यासाठी जुने की नवे आरक्षण लागू होणार, याबद्दलही गोंधळ आहे. 

दरम्यान, काष्टीत कोतवाल व पोलिस पाटील ही महत्त्वाची पदेही अनेक वर्षे रिक्तच आहेत. ती भरण्याबाबतही कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य संदीप पाचपुते म्हणाले, सरपंचासह रिक्त पदे भरण्याबाबत आम्ही मोठा पाठपुरावा करीत आहोत. ग्रामपंचायतीचे ठरावही दिले. मात्र, प्रशासन दाद देत नाही. आता सरपंचनिवडीसाठी आंदोलनाची वेळ आली आहे.'' 

काष्टी येथील सरपंचनिवडीबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करीत आहोत. नवा सरपंच सदस्यांमधून होणार असला, तरी आरक्षण कुठले लागणार, याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. तेथील पंचायत समिती सदस्याची निवडणूक मात्र लवकरच होणार असून, त्याबाबत कार्यक्रम सुरू आहे. 
- प्रदीपकुमार पवार, तहसीलदार, श्रीगोंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK U19: भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजांनी टेकले गुडघे! आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

Latest Marathi News Live Update: सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर उपस्थित

Driving Test: ...तर आरटीओ अधिकाऱ्यांवर चौकशीचा फास? ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेसाठी नवीन नियम लागू; आरटीओ यंत्रणा हादरली

Pune News: मावळात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करत संपवलं, झुडपात आढळला मृतदेह | Sakal News

Maharashtra Politics: २ महिन्यांत सत्तेचा मोठा उलटफेर? उपमुख्यमंत्री थेट मुख्यमंत्री होणार अशी भविष्यवाणी, पडद्यामागे काय सुरू आहे?

SCROLL FOR NEXT