The power supply of Talegaon scheme in Sangamner taluka has been cut off 
अहिल्यानगर

तळेगाव योजनेचा वीज पुरवठा खंडीत; वीजबीलांच्या थकबाकीमुळे ओढावणार पाणी टंचाईचं संकट

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) :  तालुक्‍यातील दुष्काळी तळेगाव पट्ट्यातील 20 गावांसाठी वरदान ठरणारी तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा 6 कोटी, 49 लाख, 83 हजार 360 रुपये थकीत वीज बिलापोटी, महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या योजनेच्या 20 लाभार्थी गावांचा पाणीपुरवठा बंद होणार आहे.
 
या योजनेसाठी वडगावपान येथील पंपिंग स्टेशनचे फेब्रुवारी महिन्याचे विज बिल 3 लाख 77 हजार 688 रुपये व प्रवरा नदीकाठच्या निंबाळे जॅकवेलचे वीज 7 लाख 15 हजार 486 रुपये आहे. यापैकी 5 लाख रुपये वीज बिल भरल्याची माहिती योजनेचे सचिव सुरेश मंडलिक यांनी दिली आहे. तळेगाव प्रादेशिक योजनेद्वारे लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या रकमा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र अपेक्षित पाणीपट्टी योजनेकडे जमा न झाल्याने, वीज बिल थकबाकी सुमारे साडेसहा कोटींवर पोचली आहे. सध्या निळवंडे धरणाचे आवर्तन प्रवरा नदीतून सुरु आहे. वीज खंडित झाल्याने आवर्तनाचे पाणी योजनेच्या साठवण तलावात येणे अशक्‍य आहे. त्यामुळे पाणीप्रश्न अधिक गंभीर बनू शकतो, असेही योजनेचे सचिव सुरेश मंडलिक म्हणाले.
 
या बाबत संगमनेर पंचायत समितीत जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी गावांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्य आशा इल्हे, तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच बाबासाहेब कांदळकर, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन दिघे आदींसह लाभार्थी गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. या बैठकीत पाणीपट्टी वसुली करून वीज बिल भरण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. लाबार्ती गावांमधील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी योजनेअंतर्गतच्या गावातील ठरलेल्या पाणीपट्टीची रक्कम भरुन सहकार्य करण्याचे आवाहन महेंद्र गोडगे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून लाज वाटते…” महेश मांजरेकरांच्या एका वाक्याने खळबळ, म्हणाले "आता आता विकास नको!"

Kharmas 2026: 14 जानेवारीपूर्वी 'हे' उपाय अवश्य करा! लग्नातील सर्व अडथळे क्षणार्धात होतील दूर, अवघ्या काही दिवसांत येईल स्थळ अन् लग्न पक्कं!

Mutual Fund : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! JioBlackRock चे 2 नवे म्युच्युअल फंड लाँच; पैसा सुरक्षित ठेवण्याची नवी संधी?

Digital Arrest : नाना पाटेकरांनी चोराकडूनच उकळले ६० हजार रुपये! डिजिटल अरेस्टला चकवा देण्याची अनोखी युक्ती

अमेरिकेच्या हिताविरोधात काम! ६६ जागतिक संघटनामधून बाहेर पडण्याची ट्रम्प यांची घोषणा; भारताच्या नेतृत्वाखालील संस्थेचाही समावेश

SCROLL FOR NEXT