Prabhakar Patil Police Inspector in Shevgaon taluka
Prabhakar Patil Police Inspector in Shevgaon taluka 
अहमदनगर

कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे पोलिस निरीक्षक पाटील यांच्यासमोर आव्हान

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : वाळू तस्करी, चोऱ्यांचे सत्र व अवैध धंदयांनी ग्रासलेल्या शेवगावचे प्रभारी राज संपुष्ठात येवून शेवगाव पोलिस ठाण्यात प्रभाकर पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने तालुक्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच ठाण्यातील कर्मचाऱ्यातील गटबाजी थांबवण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

शेवगाव पोलिस ठाण्यातील निरीक्षक रामराव ढिकले यांच्या बदलीनंतर गेल्या काही दिवसापासून रिक्त असलेल्या या पदावर पोलिस मुख्यालयातील प्रभाकर पाटील यांची नियुक्ती झाली. त्यांनी नुकताच ठाण्याचा पदभार स्विकारला असून कामकाजास सुरुवात केली आहे. सध्या विविध पक्ष, संघटना व कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी चढाओढ सुरु झाली आहे.काही दिवसांपासून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेबरोबरच अवैध धंदयांनी चांगलेच डोके वर काढले आहे. 

ग्रामीण भागात सर्वत्र सुरु असलेली अवैध दारु विक्री, शेवगाव शहरासह अनेक मोठ्या गावांमध्ये बिनबोभाट सुरु असलेले जुगार अड्डे, लिलाव झालेला नसतांनाही सुरु असलेला वाळू उपसा, वाहन व मोबाईल चो-यांचे सत्र यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली असल्याने नव्याने आलेल्या पाटील यांच्या समोर ते थांबवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

यापूर्वी घडलेले ऊस दरवाढीचे आंदोलन, त्यातून झालेला गोळीबार, तिहेरी निर्घृण हत्याकांड यामुळे तालुक्याची शांतता प्रिय असलेली ओळख पुसली गेली. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यात असलेल्या गटबाजीमुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळत असल्याने सर्व प्रथम अतंर्गत गटबाजी थांबवून पोलिसांची सर्व सामान्य नागरीकांत मलीन झालेली प्रतिमा सावरावी लागणार आहे. तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा असून पूर्वेला मराठवाडयाच्या सरहद्दीमुळे अनेक गुन्हेगारांचा याभागात वावर असतो. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा विचार करता मोठे कार्यक्षेत्र सांभाळण्याचे कसब असलेला अधिकारी शेवगावला आवश्यक होता.

पाटील यांनी यापूर्वी जामखेडसह अनेक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. शेवगाव तालुक्यात फारसा राजकीय संघर्ष नसला तरी त्यांना दुस-या फळीतील राजकीय कार्यकर्त्यांना व वाळू तस्करीतील मोहक्यांना ठराविक अंतरावर ठेवून कामकाज करावे लागणार आहे. येत्या काही दिवसात तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती व शेवगाव नगरपरीषदेची निवडणुक होत आहे. त्या निमीत्त स्थानिक पातळीवर मोठा संघर्षही पहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत पाटील यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. 

तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यास आपले प्रथम प्राधान्य राहील. पोलीस आणि सर्व सामान्य नागरीक यांच्यातील समन्वय राखण्यासाठी आपण सर्वांना बरोबर घेवून प्रयत्न करु. मात्र गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या कोणाचीही गय केली जाणार नाही. 
- प्रभाकर पाटील, पोलिस निरीक्षक, शेवगाव 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT