As the president of the sugar factory, Dr. Narendra Ghule 
अहिल्यानगर

घुले पाटील कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ. नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग उपाध्यक्ष

सुनील गर्जे

नेवासे : तालुक्यातील भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र घुले तर उपाध्यक्षपदी माजी आमदार पांडुरंग अभंग यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर मावळते अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. 

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांची निवडणूक  माजी आमदार नरेंद्र घुले व  माजी आमदार चंद्रशेखर घुले   नेतृत्वाखालील  ( ता. २१)  जानेवारी रोजी बिनविरोध झाली होती.

ज्ञानेश्वर'च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे निवडीसाठी  मंगळवार (ता. २) रोजी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांचे अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा  कारखाना अतिथीगृहात संपन्न झाली. अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले  व पांडुरंग गमाजी अभंग यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आहेर यांनी केली.

यावेळी मावळते अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, जेष्ठ संचालक अड देसाई देशमुख, डॉ. क्षितिज घुले पाटील, काकासाहेब नरवडे, विठ्ठल लंघे,  बबन भुसारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांचेसह सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

दरम्यान निवडी जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग , डॉ. क्षितिज घुले यांच्यासह उपस्थितांनी स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेतले. 

लोकनेते घुले पाटलांची परंपरा कायम ठेवणार : डॉ. घुले 

" स्वर्गीय  लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी शेतकरी, कामगार व कष्टकरी यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्याची शिकवण आपल्याला घालून दिली आहे. त्यांच्याच विचाराची परंपरा आपण कायम ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी 'सकाळ'शी बोलतांना दिली. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT