Fruit Processing Center at Mahatma Phule Agricultural University esakal
अहिल्यानगर

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फळ प्रक्रिया केंद्राचे खाजगीकरण

सकाळ वृत्त सेवा

राहुरी विद्यापीठ (जि. नगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील काढणी पश्चात तंत्रज्ञान केंद्र हे सरकारी-खाजगी भागीदारीद्वारे भाडेतत्वावर लिलियम फुडस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालविण्यास दिले. या प्रकल्पाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते झाले.

विद्यापीठाचे उत्पन्न वाढणार सोबत रोजगार निर्मिती होणार

शेतकऱ्यांचे भाजीपाला तसेच फळे यांच्या हाताळणीमध्ये, वाहतूकीमध्ये तसेच साठवणुक करतांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हेच नुकसान टाळण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर विकसित केले आहे व या केंद्रामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली मशिनरी देखील विद्यापीठाकडे आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे हे केंद्र खाजगी भागीदारी मध्ये सुरू करण्यासाठी विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाचे उत्पन्न वाढणार असून रोजगार निर्मिती होणार आहे.

यावेळी लिलियम फुडस् प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सुरेश शेटे यांनी या केंद्रातून विविध फळे, भाजीपाल्याचे, प्रक्रियायुक्त पदार्थ तसेच ज्यूस, सरबत, सीरप, स्क्वॅश, जाम, कँन्डी असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

विद्यापीठाचे फुले ड्रिंक आता मार्केटमध्ये येणार

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सुभाष पुरी व डॉ. राजाराम देशमुख यांनी विद्यापीठाच्या काढणीपश्‍चात केंद्रांमध्ये फुले ड्रिंक हा विद्यापीठाचा शीतपेयांचा ब्रँड विकसित करून त्याचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केले होते. मात्र काळाच्या ओघात हा ब्रँड मागे पडला होता. आता कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शासन व खासगी भागीदारीतून पुनःश्च हा ब्रँड विकसीत होईल अशी आशा आहे.

यावेळी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव प्रमोद लहाळे, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. सचिन नलावडे, डॉ. कैलास कांबळे, डॉ. विक्रम कड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मेस्सी आला अन् ५ मिनिटात गेला... चाहते हजारो रुपये खर्चूनही पाहू शकले नाहीत; ममता बॅनर्जींनी माफी मागत दिले चौकशीचे आदेश

Solapur ZP School: सोलापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये ९५७ शाळांची पटसंख्या वाढली, ५,३९७ नवीन विद्यार्थी

Mumbai Crime: टोपीवरून वाद पेटला; व्यक्तीनं गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारली, होत्याचं नव्हतं झालं अन्... परिसरात हळहळ

Pakistan: कोणालाच विश्वास बसणार नाही! फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात असं घडलं… इतिहास बदलणारा निर्णय?

Latest Marathi News Live Update: आश्वासन फसवे ठरल्याचा आरोप करत युवा प्रशिक्षणार्थी सरकारविरोधात रस्त्यावर

SCROLL FOR NEXT