Promise given by youth to Rohit Pawar
Promise given by youth to Rohit Pawar 
अहमदनगर

Promise Day रोहित पवार मरेपर्यंत तुमच्यासोबत राहीन...!

नीलेश दिवटे

कर्जत : 'प्रॉमिस डे'च्या दिवशी एकमेकांना वचनात अडकून ठेऊन आयुष्यभर साथ द्यायची हे आपण ऐकलं आहे. परंतु अनेक तरुणांनी चक्क आमदार रोहित पवारांनाच 'प्रॉमिस डे'च्या निमित्ताने प्रॉमिस केलंय. 'रोहितदादा मरेपर्यंत मी तुमच्या सोबत राहीन' असे सोशल मिडियात वारं सुरू झालंय. 

फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्विटर,व्हाट्सअप आदी माध्यमांवर प्रॉमिस करीत तरुणाई आमदार रोहित पवारांच्या प्रेमासाठी वचनबद्ध झाली आहे. युवकांनी थेट रोहित पवार यांना केलेलं हे प्रॉमिस सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून तरुणाई साजरी करताना दिसते. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचे अनेक रंग उधळताना दिसते.७ फेब्रुवारीला 'रोझ डे' ,८ फेब्रुवारीला 'प्रपोज डे', ९ फेब्रुवारीला 'चॉकलेट डे' १० फेब्रुवारीला 'टेडी डे', ११ फेब्रुवारीला 'प्रॉमिस डे' १२ फेब्रुवारीला 'हग डे', १३ फेब्रुवारीला 'किस डे', १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' असे हे दिवस तरुणाई साजरी करते.

युवा आणि संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या आमदार रोहित पवारांची राज्यभर मोठी फळी आहे. राज्यभरातील युवकांच्या असणाऱ्या अडचणी समजून घेत त्यांना योग्य न्याय कसा मिळेल? यासाठी ते नेहमी युवकांच्या संपर्कात असतात. युवकांशी संवाद साधण्यासाठी व विविध बैठका घेण्यासाठी अनेकवेळा ते वेगवेगळ्या जिल्ह्यात जात असतात तेंव्हा त्यांच्या स्वागताला आणि सभेला होत असलेली गर्दी त्यांची लोकप्रियता सिद्ध करते.

मतदारसंघातील असो वा मतदारसंघाच्या बाहेरील असो आपल्या कार्यकर्त्याशी एकदा संवाद साधला की त्याला कायम स्मरणात ठेवणारी आमदार रोहित पवारांची स्मरणशक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्मरणशक्तीसारखीच आहे. त्यामुळेच युवकांच्या हृदयात 'मिनी शरद पवार' असलेले रोहित पवार तरुणाईला हवेहवेसे वाटतात.

असं नेतृत्व जपलं पाहिजे,वाढवलं पाहिजे!
'प्रॉमिस डे'च्या निमित्ताने मी रोहितदादांना प्रॉमिस केलं आहे की, मरेपर्यंत तुमच्यासोबत राहील. रोहितदादा हे नव्या पिढीचे, युवकांच्या मनातील खंभीर नेते आहेत, ते युवकांसाठी कायम झटत असतात, आणि असं नेतृत्व आपण कायम जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. रोहितदादांच्या सोबत शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा आहे.
- अमोल मोटे (रोहित पवार समर्थक)

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT