punde family 65 years in rashin lord ram birth ceremony celebrated ahmednagar Sakal
अहिल्यानगर

Ram Mandir : पासष्ट वर्षांपासून राशीनमध्ये साजरा होतोय श्रीराम जन्मोत्सव

पुंडे कुटुंबीयांचा पुढाकार; घराघरात पोहोचवले श्रीराम

दत्ता उकिरडे

राशीन : येथील पुंडे कुटुंबीयांच्या पुढाकारातून राशीनमध्ये पासष्ट वर्षांपासून दरवर्षी राम जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे. पुंडे कुटुंबीयांची रामभक्ती आणि त्यांच्याकडून केला जात असलेल्या राम जन्मोत्सवाने जवळजवळ साडेपाच तपांचा कालावधी पूर्ण केला आहे.

या कालखंडात पुंडे कुटुंबीयांच्या माध्यमातून हजारो भाविक रामभक्तीच्या सेवेत दाखल झाले आहेत. ही परंपरा विनामोबदला आजही अखंड सुरू असून त्याद्वारे घराघरात भगवान श्रीराम आणि त्यांचे महात्म्य पोहोचले आहे.

६५ वर्षांपूर्वी (१९५९) हभप श्रीधर पुंडे गुरुजी यांनी सुरू केलेला रामजन्मोत्सव आणि अखंड राम-नाम-जप आजही तितक्याच भक्तिभावाने आणि त्याहीपेक्षा अधिक जोमाने राशीनमध्ये सुरू आहे.

पुंडे गुरुजी नंतर भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा आणि सेवेचा वारसा त्यांचे चिरंजीव ॲड. अरुण पुंडे यांनी भक्तिभावाच्या मार्गावरून आणि सांप्रदायाच्या भक्कम विचारधारेतून पुढे चालवला आहे. हजारो भाविकांच्या मुखात, मनात आणि ध्यानात राम नाम देण्याचे अतुलनीय काम ॲड. पुंडे यांनी केले आहे.

अयोध्येच्या पार्श्वभूमीवर...

अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त सामुदायिक रामरक्षा स्रोत पठण व श्रीराम नाम अखंड जपाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामप्रदक्षिणा, रामफेरी, काकडा, भजन श्रीरामास अभिषेक, हनुमान चालिसा पठण,

महाआरती, सवाद्य भव्य मिरवणूक आणि महाप्रसाद असे शनिवार ते सोमवार तीन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे लाइव्ह प्रक्षेपण पडद्यावर दाखविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ॲड. अरुण पुंडे यांनी दिली.

पाचशे एक घरांत राम जप

या राम मंदिरात दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदा ते रामनवमी दरम्यान दहा दिवस रामजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून रामजन्मोत्सव साजरा केला जातो. पुंडे यांनी काही वर्षांपूर्वी राशीनमधील पाचशे एक घरांमध्ये पाचशे एक दिवस रामनाम जप केला. दरदिवशी एका नवीन घरात राम नाम जप करण्याचे काम त्यांनी केले.

लोकसहभागातून साकारले राम मंदिर

राशीनमध्ये रामाचे मोठे मंदिर नव्हते. २७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९७ साली १६ व्या शतकातील उदबोधन मठात ॲड. पुंडे यांनी लोकसहभागातून सुंदर असे राम मंदिर साकारले. साडेतीन फूट उंचीच्या राम-लक्ष्मण आणि सीतेच्या संगमरवरी मूर्ती बसविल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT