Pune Tehsildar takes action in Ahmednagar 
अहिल्यानगर

महसूलमध्ये भाऊबंदकी ः पुणेवाल्यांकडून नगरमध्ये तस्करांवर कारवाई...नगरवाले म्हणतात, आमच्या हद्दीत शायनिंग करू नका

संजय आ. काटे

श्रीगोंदे : शिरुरच्या नायब तहसीदारांनी दोन दिवसांपूर्वी दाणेवाडी (ता. श्रीगोंदे) येथील घोडनदीपात्रात वाळूच्या बोटींचा स्फोट करुन कारवाई केली. मात्र, श्रीगोंद्याच्या हद्दीत येत कुठलेही कारण नसताना त्यांनी ही कारवाई केली. दरम्यान तेथील वाळू उपसाच बंद असून नदीपात्राच्या कडेला लावलेल्या बंद बोटी फोडल्याचे येथील तहसीलदार महेंद्र माळी यांचे म्हणणे आहे. 

केवळ शायनिंगच्या कारवाई करु नका, आम्ही थेट कारवाईसाठी सक्षम आहोत, असे शिरुरच्या महसूल यंत्रणेला सुनावले आहे.

वाळू कारवायांवरुन सध्या श्रीगोंदे व शिरुर महसुल यंत्रणेत जुंपण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी वाळूचोरांचा पाठलाग करीत श्रीगोंद्याच्या हद्दीत येत म्हसे येथे कारवाई केली. त्यांची ती कारवाई चर्चेचा विषय ठरली होती.

आता दाणेवाडी येथे श्रीगोंद्याच्या हद्दीत अशीच कारवाईचा प्रयत्न तेथील निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हेट्टे यांच्या पथकाने केली. त्या पथकाने तेथील सहा बोटी फोडून वाळूचोरांचे सुमारे ३५ लाखांचे नुकसान केल्याचा दावा केला. मात्र, त्यांची ही करवाई आता वादात सापडली आहे.

श्रीगोंद्याच्या हद्दीत येवून शिरुरच्या पथकाला कारवाई करता येत नाही. तसे संकेत ठरले आहे. मात्र, तरीही व्हेट्टे यांनी ही कारवाई करण्याचे धाडस का दाखविले. यावरुन सध्या वाद रंगत आहे. त्यावरुन श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनी थेट नाराजी व्यक्त करीत शिरुरच्या प्रांताधिकाऱ्यांकडे या कारवाईची तक्रार केली.

माळी यांच्या म्हणण्यानूसार, दाणेवाडी येथे कुठलाही वाळू उपसा अथवा चोरी सुरु नव्हती. ही कारवाई होत असताना तेथील कामगार तलाठ्यांनी संबंधितांना अशी हद्द ओलांडून का कारवाई करता अशी विचारणा केली होती. शिवाय ज्या बोटी फोडल्याचा शिरुरचे पथक दावा करतात त्या बंद अवस्थेत होत्या. ती संख्या सहा नव्हे तर दोनच होती. मग बंद असणाऱ्या बोटी फोडून काय सिध्द करण्याचा प्रयत्न होतोय, अशी विचारणा केली.

आमची हद्द आहे, आम्ही पाहून घेवू, आपल्या लोकांनी अशी शायनिंग दाखविणारी कारवाई कशासाठी केली, असा प्रश्न तहसीलदार माळी यांनी उपस्थितीत केल्याने दोन्ही महसूल यंत्रणेत तणाव जाणवत आहे.


शिरुरच्या पथकाचा श्रीगोंद्याच्या हद्दीत कारवाई करण्याचा संबध नाही. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत. शिवाय बंद बोटी फोडून शायनिंग दाखविणारी ही कारवाई झाली. आता तेथील प्रांताधिकाऱ्यांशी बोललो आहे. यापुढे असा प्रयत्न झाल्यास पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू.
- महेंद्र माळी, तहसीलदार श्रीगोंदे.
 

अशी काही कारवाई झाल्याचे मला समजले. मात्र, संबंधित अधिकारी, पथकातील कर्मचाऱ्यांनी  कारवाईची कुठलीही माहिती अगोदर दिली नाही अथवा आपली परवानगीही घेतलेली नाही.
- लैला शेख, तहसीलदार शिरुर.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT