Quarantined the school but they changed the look of the school 
अहिल्यानगर

व्वा रे वा... शाळेत क्वारंटाइन केलं पण त्यांनी शाळेचंच रूप बदललं

शांताराम जाधव

बोटा ः  शाळेत क्वारंटाइन व्हावे लागेल म्हणून मुंबई-पुण्यातून लोक यायला घाबरत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळता यावा, यासाठी त्यांना क्वॉरंटाईन केले जाते. त्याची काही नागरिकांत भीती निर्माण असताना अशाच क्वारंटाईन झालेल्या काही हातांनी आपल्याच गावातील शाळा पूर्णपणे स्वच्छ करून एक सामाजिक संदेश दिला आहे. विपरित परिस्थितीतही विधायक काम कसे करायचे हे त्यांनी दाखवून दिले.

संगमनेर तालुक्‍यातील सारोळे पठार या गावात एकवीस जणांना शाळा व आश्रमशाळा यात विभागणी करून क्वारंटाईन केलेले आहे. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत क्वारंटाईन केलेल्या आठ जणांनी जेवण, कपडे, स्वच्छतागृह अशा तक्रारींना दुय्यम स्थान देत शाळा स्वच्छतेचा प्रस्ताव आपसांत मांडला. उपलब्ध साधनांचा आधार घेऊन त्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ करण्यास सुरवात केली. झाडांना वाफे बनविले, टाकीचा परिसर स्वच्छ करणे, कंपोस्ट खत तयार करणे, अशी कामे करत या आठ जणांनी शाळेत छोटीशी बागही फुलविली आहे.

आम्ही या शाळेत शिकलो. व्यावसायिक झालो. क्वारंटाईनमुळे नकळत आम्हाला या ज्ञानमंदिराच्या स्वच्छतेचे पाईक होण्याची संधी मिळाली, असे एका जणाने सांगितले. त्यांची उमेद पाहून कोरोना ग्रामसुरक्षा समितीनेही ठिबक सिंचनाचे आणि स्वच्छतेसाठी गरजेचे असलेले साहित्य त्यांनी पुरविले आणि या सर्वांच्या चहा-पाण्याची व्यवस्था केली. पाणी व्यवस्थेमुळे शाळेचा परिसर स्वच्छ व हिरवागार झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT