राधाकृष्ण विखे पाटील ई सकाळ
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री शोभेच्या बाहुल्या - राधाकृष्ण विखे पाटील

सकाळ डिजिटल टीम

कोल्हार (जि. नगर) : राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कोणालाही नोकऱ्या देण्यासाठी किंवा बदल्या करण्याचे भाव हॉटेलमधील मेनू कार्डप्रमाणे ठरले आहेत. सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले आहेत, असा आरोप करतानाच नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री फक्त शोभेच्या बाहुल्या ठरल्या आहे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

कोरोनाच्या काळात राज्यसरकारने लोकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार मदत देत नसल्याचा कांगावा करीत आहे. आम्ही मात्र कोरोना सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना आधार दिला. अशावेळी राज्यातील मंत्री फक्त भजे खाण्यासाठीच बसलेत काय, असा प्रश्नही विखे पाटल यांनी विचारला. सोनगाव (ता. राहुरी) ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा- प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक सुभाष जांनजी अंत्रे होते. यावेळी ॲड. अप्पासाहेब दिघे, रमेश पन्हाळे, सुभाष ना. अंत्रे, पाराजी धनवट, जे. पी. जोर्वेकर, सोनगाव व सात्रळचे सरपंच अनुक्रमे अनिल अनाप व सतिष ताठे, उपसरपंच किरण अंत्रे, कारभारी ताठे, साहेबराव नालकर, मच्छिंद्र अंत्रे आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की आघाडी सरकारला कोणतेही चांगले काम करता आले नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वित्त आयोगाचा निधी रुग्णवाहिकासाठी वळविला. त्याला आमचा आक्षेप नाही, परंतु वित्त आयोगाचे पैसे पक्षासाठी व कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी वापरणे एवढेच काम पालकमंत्र्यांनी केले, यासारखे दुर्दैव नाही. निधी मिळविण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला घटनेने दिला आहे. त्यांना हात लावण्याचा कोणाला अधिकार नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्याशाप देण्यापलीकडे राज्यसरकार कोणतेच काम करत नाही. केंद्राने लस दिली म्हणूनच राज्य लसीकरणात पहिल्या क्रमांकावर गेले. सरकारने लाखो रुपयांची वीजबिले शेतकऱ्यांच्या माथी मारली. पीकविम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शाळा सुरू करण्याबाबत मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. धोरण समाजाला पूरक नसलेल्या सरकारला जनता आता नापास केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विखे पाटलांनी दिला. या वेळी राजेंद्र अनाप, नारायण धनवट व मौलाना रऊफ आदींची भाषणे झाली. प्रास्तविक पाराजी धनवट यांनी केले. सूत्रसंचालन साहेबराव अनाप यांनी केले. किरण अंत्रे यांनी आभार मानले.

लॉकडाऊन हेच राज्य सरकारचे धोरण

चांगले काम करीत असल्याचा डांगोरा पिटणारे राज्य सरकार अधिवेशन घेऊन चर्चेला का तयार होत नाही, असा सवाल करून विखे म्हणाले, की अधिवेशन घेण्याची वेळ आल्यावर लगेचच कोरोनाचे आकडे कसे वाढतात. सरकारला कोविड हे हत्यार सापडले आहे. लॉकडाऊन हेच राज्य सरकारचे एकमेव धोरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT