Rahul Jagtap's unique resolution on the occasion of Pawar's birthday 
अहिल्यानगर

शरद पवारांना पंतप्रधान झालेलं बघायचंय, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने सोडला अनोखा संकल्प

संजय आ. काटे

श्रीगोंदे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेला संघर्ष 80व्या वर्षीही सुरू आहे. पवार यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांनी देशातील शेतकरी टिकला. त्यांच्या याच संघर्षात आता तरुणांची मोठी फळी उभी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील तरुणांची आक्रमकता, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, असा दुहेरी फायदा या लढ्यात घेताना पवार यांच्या स्वप्नातील शेतकरी उभा करण्याचा संकल्प सोडल्याची माहिती माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली. 

"सकाळ'शी बोलताना जगताप म्हणाले, ""श्रीगोंदे मतदारसंघात शेतकरीहिताचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न सुरू आहेत. आता त्यात तरुणांचाही सहभाग घेणार असून, शेतकऱ्यांच्या समस्यांभोवती तरुणाईच्या आधाराचे कवच उभे करण्याचा प्रयत्न आहे.

सरकारदरबारी जे प्रश्न सुटणार आहेत, त्यांचा यात समावेश न करता, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करताना या तरुणांचा उपयोग करून घेऊ.''

""आमदार असताना मी प्रामाणिक काम केले. मात्र, तरी माझ्यावर टीका झाली. ती करणारे आता कोठे आहेत,'' असा सवाल करीत जगताप म्हणाले, ""राज्यात भाजप सरकार असताना माझ्याकडे आमदारकी आली. त्या वेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कामे होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले; पण आता आम्ही सरकारच्या माध्यमातून येथे कामे करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

कुकडी, घोड व सीना धरणांतील पाण्याचे न्याय्य वाटप करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच, रखडलेली साकळाई योजना मार्गस्थ व्हावी, यासाठीही राबत आहोत. माणिकडोह ते डिंभे धरणांदरम्यान बोगद्याचे काम लवकरच मार्गी लागेल.'' 

देशाचे नेतृत्व करावे 
जगताप म्हणाले, ""पवार यांचा उद्या (शनिवारी) 80वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळा कार्यक्रम करता येणार नसला, तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प सोडणार आहोत. ज्यांनी उभे आयुष्य शेतकरी व सामान्यांचे संसार उभे करण्यात खर्च केले, त्यांना देशाचे नेतृत्व करताना पाहण्याचे स्वप्न अजूनही आम्हीच काय, राज्यातील सगळेच बाळगून आहेत.'' 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT