मोहन वाघ ई सकाळ
अहिल्यानगर

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांचे निलंबन रद्द

कुलगुरूंनी केली होती कारवाई

रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाशकुमार पाटील यांनी गेल्या आठवड्यात कुलसचिव मोहन वाघ यांना कामात अनियमितता आढळल्याने तडकाफडकी निलंबित केले होते. त्यांचा पदभार विभागप्रमुख डॉ. महानंद माने यांच्याकडे दिला होता. यामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली होती. (Rahuri Agricultural University registrar Mohan Wagh's suspension canceled)

या निलंबनासंदर्भात कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश वेगळा आदेश काढला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी मोहन वाघ यांचे निलंबन रद्द केले.

मोहन वाघ यांनी कुलगुरु, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचेकडे सादर केलेला खुलासा, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार चौकशीअंती निर्णय घेणे उचित होईल. या संदर्भात महासंचालक, कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी आठ दिवसांत चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास अहवाल सादर करावा, असे या शासन आदेशात म्हटले आहे.

ही चौकशी पूर्ण होईपर्यंत, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (५) (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी ३ मे रोजी पारीत केलेल्या मोहन वाघ यांच्या निलंबन आदेशास स्थगिती देण्यात येत आहे. या आदेशानुसार मोहन वाघ यांनी कुलसचिवपदाचा पदभार स्वीकारल्याचे समजते.(Rahuri Agricultural University registrar Mohan Wagh's suspension canceled)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament debate: "राईट टू रिकॉल" म्हणजे काय? काम न करणारे आमदार-खासदार बरखास्त होणार? संसदेत झाली चर्चा

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांचा आज 'भारत बंद'; देशव्यापी बंदमुळे जनजीवनावर परिणाम होणार!

अत्याचार प्रकरणी ४० दिवस कोठडीत, तरी KDMC पालिकेनं दिला पगार; पोलिसांनाही माहिती नव्हतं तो पालिकेत कार्यरत

Solapur Crime: माढा तालुक्यातील नवविवाहितेचा खून; बार्शीच्या सत्र न्यायालयाने जाऊबाईस सुनावली जन्मठेपची शिक्षा!

Rahul Gandhi : ‘भारतमाते’ला विकले; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्ला

SCROLL FOR NEXT