In Rahuri, water has accumulated in the market streets due to the rupture of the aqueduct.jpg 
अहिल्यानगर

राहुरीत जलवाहिनी फुटल्याने बाजारपेठेतील रस्ता झाला जलमय

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : शहरात गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी भर बाजारात राहुरी पालिकेच्या पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली. पेठेतील रस्ता जलमय होऊन, गुडघाभर पाणी वाहू लागले. तब्बल एक तासात हजारो लिटर पाणी बाजारपेठेत वाहिले. आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकरी व ग्राहकांची तारांबळ उडाली. अनेक जणांचा शेतमाल पाण्याबरोबर वाहून गेला. पालिका कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद केल्यावर बाजारकरुंनी सुटकेचा निश्वास सोडला.

गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजता बाजारपेठेतील महाराष्ट्र बँकेसमोर जलवाहिनी फुटली. पेठेतील रस्त्यावरून गुडघाभर पाणी शनि-मारुती मंदिराच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पाण्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांचा शेतमाल पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही तारांबळ उडाली. बाजारकरूंची शेतमाल वाचविण्यासाठी तारांबळ उडाली. 

राहुरीच्या बाजारपेठेतून सहा इंच व्यासाची लोखंडी व १४ इंच व्यासाची सिमेंटची जलवाहिनी आहे. त्यातील नेमकी कोणती जलवाहिनी फुटली. याचा अंदाज येत नव्हता. १९९८ साली पसरविलेल्या या जलवाहिन्या जीर्ण व कमकुवत झालेल्या आहेत. जलवाहिनी फुटल्याची माहिती समजताच दुपारी सव्वाएक वाजता जलकुंभावरुन पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख काकासाहेब आढागळे त्यांच्या पथकासह बाजारपेठेत दाखल झाले. जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

SCROLL FOR NEXT