Rain of money to bring "Varun Beverage" to Parner 
अहिल्यानगर

पारनेरमध्ये "वरुण बेव्हरेज" पाडणार पैशांचा पाऊस

मार्तंड बुचुडे

पारनेर ः सुपे परिसरातील म्हसणे फाटा शिवारात वरूण बेव्हरेज कंपनी पैशांचा पाऊस पाडणार आहे. या पावसामुळे बेरोजगारांची घरे हिरवीगार होतीलच, परंतु  परिसरातील बाजारपेठेलाही पालवी फुटेल.

येथे यापूर्वीच तीन नव्या कंपन्यांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या एमआयडीसीमुळे पारनेरसह जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 

सुपे येथे 1998मध्ये एमआयडीसी मंजूर झाली. सुमारे 329.84 हेक्‍टरवर ही औद्योगिक वसाहत उभी आहे. त्यात 535 भूखंड असून, बहुतेक सर्व भूखंडांचे वाटप झाले आहे. मात्र, अनेक भूखंडांवर अद्याप कोणतेच उद्योग सुरू झालेले नाहीत. अनेक भांडवलदारांनी फक्त गुंतवणूक म्हणून भूखंड ताब्यात घेतले. त्यावर शेड उभारल्या. मागील 22 वर्षांपासून हे भूखंड केवळ अडवून ठेवले आहेत.

जुन्या औद्योगिक वसाहतीत बोटावर मोजण्याइतके मोठे उद्योग आहेत. बाकी छोटे-मोठे असे सुमारे शंभराहून अधिक उद्योग येथे सुरू आहेत.

आता म्हसणे फाटा येथे नव्याने 946.70 हेक्‍टरवर नवी एमआयडीसी उभी राहत आहे. त्यापैकी 564 हेक्‍टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. नवीन वसाहतीत यापूर्वीच मिंढा, कॅरिअर, तसेच माडिया कंपन्यांची उभारणी व जोडणी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच हे कारखाने सुरू होतील. 

आता येथे नव्याने वरुण बेव्हरेज कंपनी 820 कोटींची गुंतवणूक करीत आहे. त्यांनी येथे सुमारे 50 एकर जागेची मागणी केली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हसणे फाटा येथील नव्या एमआयडीसीत गुंतवणूक करण्यास पसंतीही दिली आहे.

लवकरच ही कंपनी जागा खरेदी करून तेथे कारखान्याच्या उभारणीस सुरवात करणार आहे. ही कंपनी सुरू झाल्यास जिल्ह्यातील सुमारे 10 हजारांहून अधिक युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. 

म्हसणे फाटा येथील एमआयडीसीत सर्व प्रकारच्या सुविधा सरकारी पातळीवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात प्रशस्त रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांची पूर्तता औद्योगिक विकास महामंडळाने केली आहे. त्यामुळे येथे येण्यास अनेक कंपन्या इच्छुक आहेत. अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाने येथील जागेची पाहणी केली आहे. त्यांना जागा व ठिकाणही पसंत आहे. 

रेल्वे मालधक्‍क्‍यासाठी प्रयत्न 
म्हसणे फाटा येथून नगर रेल्वेस्टेशन 35 किलोमीटरवर, तर पुणे विमानतळ 110 किलोमीटरवर आहे. म्हसणे फाटा येथे रेल्वेचा मालधक्का करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीचे प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे या वसाहतीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT