Bhandardara Dam
Bhandardara Dam 
अहमदनगर

अकोल्यातील ५ जलाशये भरली; धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कायम

सकाळ डिजिटल टीम

अकोले (जि. नगर) : मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे आंबीत, पिंपळगाव खांड, देवहंडी, कोथळा व वाकी जलाशये शंभर टक्के भरली आहेत. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी गाळतुडवणी, आवणीची कामे करताना दिसत आहेत. बारी, वारंघुशी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने आज (शुक्रवार) पहाटे तीन वाजता वाकी जलाशय शंभर टक्के भरला. आतापर्यंत तालुक्यातील सहा धरणे भरली आहेत. (Rainfall is maintained in the catchment area of ​​Mula and Bhandardara dams)

तालुक्यात जोरदार पाऊस होत असल्याने २०२ दशलक्ष घनफुटांचा बलठण जलाशय भरला. कोदणी वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली, तर रंधा धबधबा अवतीर्ण झाला आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा नदीला पूर आला आहे. भंडारदरा जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. वादळी पाऊस झाल्याने उडदावणे येथील बुवाजी गांगड, सखाराम गांगड यांच्या घरांवरील कौले उडाली. विजेचे खांब उन्मळून पडल्याने दहा गावे काही काळ अंधारात होती.

काल झालेल्या पावसामुळे भंडारदरा जलाशयात ४५९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाल्याने जलाशयात ६६२७ दशलक्ष घनफूट म्हणजे ६०.२ टक्के पाणीसाठा झाला. तसेच वीजनिर्मितीसाठी ८४० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. निळवंडे जलाशयात १४३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली, तर जलाशयात १९१३ दशलक्ष घनफूट पाण्याचा म्हणजे २२.९७ टक्के साठा उपलब्ध आहे. आढळात ४८७ दशलक्ष घनफूट म्हणजे ४५.१९ टक्के साठा झाला आहे. मुळा जलाशयात वेगाने पाण्याची आवक होत असून, कोतूळ येथील पुलावरून १६७५० क्यूसेकने मुळाचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे प्रवरा, मुळा, आढळा नद्या वाहू लागल्या आहेत.

(Rainfall is maintained in the catchment area of ​​Mula and Bhandardara dams)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT