rains in the district have caused severe damage to soybean crop Sakal
अहिल्यानगर

अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनची नासाडी; शेंगांना फुटले कोंब

प्रा. सुनील गर्जे

नेवासे (जि. अहमदनगर) : जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली खरी. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही ऐन काढणीच्या काळात पिकांला फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या शेतांत पाणी साचलेले आहे. त्यामुळे सोयाबीन शेंगांना कोंब फुटले आहेत. पावसाने साधारण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त, म्हणजे एक लाख १७ हजार ८२२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सरासरी ५४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र असताना, यंदा सरासरीच्या २१७ टक्के पेरणी झाली. नगर, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यांत सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे यंदा सोयाबीनचे पीक जोमात होते. मात्र, ऐन काढणीच्या काळातच पावसाला सुरवात झाली. गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस पडला. नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांसह अन्य भागांतही जोरदार पाऊस झाला आहे.

सध्या बहुतांश भागात सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र, सततच्या पावसाने सोंगणी करता येईना. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेतांत पाणी साचले आहे. शिवाय, सततच्या पावसामुळे शेंगांना कोंब फुटले आहेत. काही ठिकाणी सोयाबीन दाणे काळे पडले आहेत, तर काही ठिकाणी पूर्णतः सोयाबीन वाया गेले आहे.

कृषी विभाग बेफिकीर

जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, कापूस, कांदा, काही प्रमाणात बाजरी, मका, भाजीपाला पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाले. या काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असते. मात्र, बहुतांश वरिष्ठ अधिकारी नुकसानीच्या ठिकाणी गेलेच नाहीत. केवळ बैठका घेण्याचा फार्स केला. त्यामुळे नुकसानीबाबत कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीच किती बेफिकीर आहेत, हे दिसून येत आहे.

यंदा सततच्या पावसामुळे शेतांत पाणी साचल्याने सोयाबीनची काढणी करता येईना. सोयाबीनची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.
- शरद डिके, जैनपूर, ता. नेवासे

अतिवृष्टीने सोयाबीन पिकाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. नफा सोडा, झालेला
खर्चही निघेल असे वाटत नाही.
- घनश्याम शेळके, दुलेचांदगाव, ता. पाथर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Majalgaon Dam: माजलगाव धरणाचे दहा दरवाजे उघडले; ३१ हजार क्युसेक विसर्गाने सांडस चिंचोलीचा संपर्क तुटला, सिंदफणा’ दुथडी भरुन

Latest Marathi News Updates : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार

Heavy Rain Precautions: राज्यात परतीच्या पावसाची तुफान बॅटिंग, नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी? वाचा एका क्लिकवर

IND vs PAK : पाकिस्तानला अपमानाचा आलाय राग! भारताविरुद्ध केली तक्रार, मॅच रेफरीवर काढला राग; काय होऊ शकते कारवाई?

Solapur Rain update:'साेलापूरतील पुलावरून वाहून गेला रिक्षाचालक'; पूना नाका पुलाजवळ दोन्हीकडे नव्हते बॅरिकेट, रिक्षा पाण्याजवळ उभी

SCROLL FOR NEXT