अहिल्यानगर

कर्जत येथील राजेंद्र गुंड यांची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड

सकाऴ वृत्तसेवा

कर्जत (अहमदनगर) : येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजेंद्र गुंड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कर्जत पंचायत समिती मध्ये उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली, यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी कामकाज पाहिले तर गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी याकामी सहाय्य केले. सकाळी बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सर्व प्रक्रिया पूर्ण करीत श्री. गुंड यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.(rajendra gund from karjat has been elected as the deputy chairman of the panchayat samiti)

यावेळी प्रशासनाच्या वतीने पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती मनीषा जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मावळते उपसभापती हेमंत मोरे, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, माजी सभापती साधना कदम, दिलीप जाधव, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगरडे, अंकुश कदम, सहायक गट विकास अधिकारी रूपचंद जगताप आदी उपस्थित होते. या निवडी बद्दल आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांनी गुंड यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT