rajendra Khilari joins NCP 
अहिल्यानगर

कोपरगावात राजेंद्र खिलारींचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

कोपरगाव (जि. नगर) : भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी यांच्यासह दिगंबर जाधव, आजिनाथ खटकाळे, बबनराव भवर, रमेश खटकाळे, रामभाऊ खटकाळे, विजय भवर, अरुण कर्डक आदी कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या सभागृहात हा प्रवेश झाला. (rajendra Khilari joins NCP with his supporters in kopargaon)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे नियोजनबद्ध प्रयत्न करतात. त्यातून प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. दीड वर्षात कोविडच्या साथीचा मुकाबला करीत असतानाही काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाचा वेग कायम ठेवला आहे. त्यांना विकासाची दृष्टी आहे, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

काळे म्हणाले, ‘‘खिलारी हे भाजपचे जुने व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. गोदावरी कालव्यांच्या पाणीप्रश्नावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी होईल. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल. अन्य पक्षाचे अभ्यासू कार्यकर्ते आपल्यासमवेत काम करू इच्छितात, हे पाहून आनंद वाटतो.’’

(rajendra Khilari joins NCP with his supporters in kopargaon)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहा वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रेयसीनं लग्नाला नकार देताच ३० वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं; मृतदेहाजवळ प्रेयसीचा फोटो

Jalna News: अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात चैतन्य; रिअल इस्टेट, सराफासह वाहन ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग; तब्बल ३० ते ३५ कोटी रुपयांच्या उलाढालीची व्यापाऱ्यांना अपेक्षा

Latest Marathi News Live Update: जळगावात सोन्याच्या दराचा उच्चांक; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर दीड लाख पार

साप्ताहिक राशिभविष्य (20–26 एप्रिल 2026) : ग्रहस्थितीचा प्रभाव; करिअर, पैसा अन् नात्यांवर काय होणार परिणाम?

RCB vs DC: मैदानात वैर, पण मनात खिलाडूवृत्ती! चालता येत नसणाऱ्या अक्षर पटेलसाठी कृणाल पांड्या बनला आधार; Photo Viral

SCROLL FOR NEXT