Raju shetti e sakal
अहिल्यानगर

राजू शेट्टी म्हणाले भाजप-महाआघाडी म्हणजे, 'चोर-चोर मावसभाऊ..'

शेट्टी म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी एका बाजूने अस्मानी, तर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे सुलतानी संकटात सापडला आहे.

शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : भाजप व महाआघाडी म्हणजे ‘चोर-चोर मावसभाऊ, सारे मिळून वाटून खाऊ.’ देशातील मंत्र्यांचे राज्य सरकार, तर केंद्रातील सरकार राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पाडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून त्यांचे हे उद्योग सुरू आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

शेट्टी म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी एका बाजूने अस्मानी, तर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे सुलतानी संकटात सापडला आहे. कोल्हापूर, सांगली भागात उसाला तीन हजार दोनशे रुपये भाव मिळत असताना तुमच्याकडे १७०० ते २१०० रुपये, असा दर दिला जात आहे. याला तुम्हीच जबाबदार आहात. केंद्र सरकारने पूर्वीचा ‘एफआरपी’चे पैसे एकर कमी देण्याचा निर्णय बदलून आता त्याचे तीन तुकडे पाडून कारखानदारांना एक प्रकारे पळवाट दिली आहे. आघाडी सरकार शेवटचा तुकडा एक वर्षानी मिळावा, यासाठी साथ देत आहे. शेतकऱ्यांना लढाई लढावी लागणार आहे. यावेळी हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख, दीपक कर्पे, सुरेश नवले आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल उगले यांनी केले.

तीन पायांचे सरकारही सामील

कायदा एकरकमी ‘एफआरपी’ देण्याचा असूनही एक वर्षापासून एकरकमी पैसे देऊ शकलेले नाहीत. तीन तुकडे करून तुमच्या पदरात पैसे कधी पडतील याचा विचार करा. यासाठी राज्यातील तीन पायांचे सरकारदेखील सामील आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

अकोले तालुक्यातील गणोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘जागर एफआरपीचा व आराधना शक्तिपीठाची’ ही यात्रा आज (बुधवारी) गणोरे येथे आली होती. या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी सुरवातीला शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष शुभम आंबरे यांनी स्वगत केले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय त्र्यंबक आंबरे, पंचायत समिती सदस्य नामदेव आंबरे, सरपंच संतोष आंबरे, किशोर आहेर, दीपक कर्पे, सुशांत आरोटे, शुभम आंबरे, शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, देवठाणचे सरपंच केशव बोडके, डोंगरगावचे सरपंच बाबासाहेब उगले. सुरेश नवले, चंद्रकांत नेहे, प्रकाश मालुंजकर, सुनील पुंडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Explainer : चॅटजीपीटी आणि जेमीनीपेक्षा भारी! आलंय नवे मेड इन इंडिया AI App, कुठून करायचं Download अन् कसं वापरायचं? पाहा

Latest Marathi News Live Update : बोरिवलीतील MHB कॉलनी परिसर झाला नशेचा अड्डा, भाजप नगरसेवकाची धाड

Atal Pension Scheme : अटल पेन्शन योजनेसाठी कोण अर्ज करू शकते आणि कोण नाही? पाहा नवे नियम

गौतमी पाटील की राधा पाटील! कोणाची किती संपत्ती? एक गाजवून आली बिग बॉस घर, तर दुसरी स्टेजवर करतेय हवा

SCROLL FOR NEXT