अहिल्यानगर

अ‍ॅन्टीजेनच्या धाकाने लसीकरणाची गर्दी हटली

विनायक दरंदले

शुक्रवारी सकाळी लस घेण्यासाठी 200 हून अधिक ग्रामस्थ रांगेत उभे होते. अॅन्टीजेन तपासणी करुनच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोनई (अहमदनगर) : कोरोना (Corona) प्रतिबंध लस घेण्यासाठी मोठी रांग लागली खरी मात्र प्रत्येकास रॅपीट अॅन्टीजेन तपासणी (Rapid antigen testing) सक्तीची केल्याने काही क्षणात रांगेतील गर्दी मागच्या मागे गायब झाली. सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (sonai primary health center) शुक्रवारी (ता.१४) रोजी हा प्रकार झाला. (Rapid antigen testing has been made mandatory at sonai primary health center)

शुक्रवारी सकाळी लस घेण्यासाठी 200 हून अधिक ग्रामस्थ रांगेत उभे होते. अॅन्टीजेन तपासणी करुनच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. रांगेतील पहिल्या 12 व्यक्तीपैकी सहा जण पॉझिटिव्ह निघाले आणि लगेचच अनेकांनी काढता पाय घेत घराचा रस्ता धरला. शनिवारी एकूण 140 लस आल्या होत्या. मात्र अॅन्टीजेन तपासणीच्या नियमाने प्रथमच अनेक लस शिल्लक राहिल्याचा प्रसंग घडला.

कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष सरपंच धनंजय वाघ यांनी केंद्राला भेट देवून गर्दी टाळण्याची सूचना केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे यांनी कोरोना स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अॅन्टीजेन तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीनंतर गुरुवार पासून लसीकरण कामात विशेष काळजी घेवून काम केले जात आहे.

एका कर्मचा-यांने गुरुवारी मर्जीतील काही व्यक्तींना बाहेर जाऊन लस दिल्याची तक्रार होती. मात्र कोरोना नियंत्रण समितीने दोन दिवसात आलेल्या एकूण लस व देण्यात आलेल्या लस याची खातरजमा केली असता कुठलेही तथ्य आढळले नाही. याबाबत ग्रामस्थ अनिल निमसे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देवून आरोग्य विभागाकडे तक्रार केलेली आहे. या चौकशीत काय झाले ते समजू शकले नाही.

(Rapid antigen testing has been made mandatory at sonai primary health center)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बातमी! जमिनींच्या पोटहिस्साबाबत राज्यभूमी अभिलेख विभागाचा माेठा निर्णय; लवकरच हाेणार अंमलबजावणी, काय आहे निर्णय?

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Chhatrapati Sambhajinagar: शाळेच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; उपाययोजनेची मागणी

Latest Marathi News Live Update : अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले

'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

SCROLL FOR NEXT