FREE MARKET 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांसाठी बाजार खुला, कृषी विभागाने घेतलाय मोठा निर्णय

सूर्यकांत नेटके

अहमदनगर : 'पिकेल ते विकेल' या संकल्पनेतून शेतमालाची थेट विक्री करता यावी, यासाठी 'संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान' राबविण्यात येत आहे. त्यातून जिल्ह्यातील 14 तालुक्‍यात साधारण 1400 केंद्रे सुरू करण्याचे नियोजन कृषी विभागाच्या 'आत्मा'कडून सुरू आहे. आतापर्यंत साधारण शंभरापेक्षा अधिक ठिकाणी ही केंद्रे सुरू झाल्याची माहिती आत्मा विभागातून देण्यात आली.

शहरीबाबूंनो, खेड्यात जमीन खरेदी करताय? त्या अगोदर ही बातमी वाचाच
 
बाजारात शेतमालाला चांगला दर मिळावा, तसेच ग्राहकांनाही दर्जेदार शेतमाल मिळावा, यासाठी शेतकरी गट व शेतकरीउत्पादक कंपन्यांमार्फत 'पिकेल ते विकेल' या संकल्पनेतून शेतमालाची थेट विक्री करता यावी, यासाठी 'रयत बाजार अभियान' राबविण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. केंद्र सुरू करण्यासाठी शेतकरी कंपनी व गटांना शहरात जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आहे. त्यासाठी कृषी विभागाने ग्रामविकास, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशीही संपर्क साधला आहे. लवकरच सर्व ठिकाणी ही केंद्रे सुरू होतील, असे 'आत्मा'तून सांगण्यात आले. 

सहा वर्षांपूर्वी प्रयत्न फसला
 
तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून सहा वर्षांपूर्वीही थेट शेतमाल विक्रीसाठी नगर शहरात चार ठिकाणी केंद्रे सुरू केली होती. मात्र, कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे ती 15 दिवसांतच बंद पडली. आता त्याची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी कृषी विभागाला काळजी घ्यावी लागेल. 

नगर जिल्ह्यात जास्तीत जास्त ठिकाणी थेट शेतमाल विक्रीची केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी हे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी 'आत्मा' प्रयत्नशील आहे. 
- अनिल गवळी, प्रकल्प उपसंचालक, अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Red Alert : राज्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; २४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार सरींचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 22 जुलै 2026

Tomato Paratha: कधी खाल्लाय का टोमॅटो पराठा? 20 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आज नक्की ट्राय करा

NEET Protest: NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन; राहुल-प्रियांका गांधी ताब्यात

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT