Reception ceremony after the discussion of selection of office bearers in the buffer zone. 
अहिल्यानगर

बफर झोनमध्ये पदाधिकारी निवडीचे चर्चेचे गुऱ्हाळ अन् सत्कार सोहळा...

दौलत झावरे

नगर ः शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने, प्रशासनाने काही भाग कंटेन्मेंट व बफर झोन जाहीर केले आहेत. असे असताना गांधी मैदानातील ऐक्‍य मंदिरात प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या बैठका सलग तीन दिवस होऊन पदाधिकाऱ्यांची निवड झाली, तसेच सत्कार सोहळाही झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कंटेन्मेंट व बफर झोनमधील नागरिकांना बाहेर पडण्यास प्रशासनाने मज्जाव केला आहे. नियम मोडून बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शहरातील गांधी मैदान परिसर प्रशासनाने बफर झोन जाहीर केला आहे. याच भागात जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची मुख्य शाखा आहे.

येथील कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी सलग तीन दिवस बैठका होत होत्या. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभही झाला. त्याचे फोटोसेशनही करण्यात आले. 

बफर झोन असताना परिसरात वाहनांची गर्दी पाहून नागरिकांनी कोतवाली पोलिसांनी माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यावर शिक्षक नेत्यांसह कार्यकर्त्यांची एकच पळापळ झाली. दरम्यान, बफर झोन परिसरात आलेल्या या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांची निवडप्रक्रिया झाल्यावर ते बॅंकेत येऊन गेल्याचे बॅंकेचे व्यवस्थापक दिलीप मुरदारे यांनी सांगितले. 

गांधी मैदान परिसर बफर झोनमध्ये आहे. तेथे वाहनांची गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेथील वाहने कर्मचाऱ्यांची असल्याचे बॅंक व्यवस्थापनाने सांगितले. 
- प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक, कोतवाली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: आमदार प्रशांत बंब यांची पत्रकार परिषद; प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

वयाच्या ५४ वर्षीही लाचेचा मोह! एक लाखाची लाच मागणारा मंडलाधिकारी अटकेत; मुरूम वाहतुकीच्या परवानगी अर्जावरील सकारात्मक अहवालासाठी मागितली लाच, वाचा...

Shirur civic protest: घनकचरा गैरव्यवहार, किमान वेतन उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी मनसेचे महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन

Dighi-Bhosari MD lab bust: पुण्यातील दिघी-भोसरीत एमडीची हायटेक प्रयोगशाळा उघड; ‘ऑपरेशन वज्र’मध्ये दोन प्रमुख तस्कर अटकेत

‘एसआयआर’ कामात हलगर्जीपणा, शिक्षकाविरुद्ध गुन्हा! फोन उचलला नाही, घरी भेटले नाहीत, ‘कारणे दाखवा’चा खुलासाही दिला नाही, वाचा...

SCROLL FOR NEXT