Recovery of fines from traders by the municipality on the background of corona in Rahuri 
अहिल्यानगर

राहुरीत व्यापाऱ्यांचा 'आमदनी अठन्नी दंड भरा रुपय्या'

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : तालुक्यात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. दोन दिवसांपासून राहुरी बाजारपेठेतील दुकानांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. पालिकेचे कर्मचारी ५०० ते एक हजारापर्यंत दंड वसूल करीत आहेत. काही व्यापाऱ्यांना दिवसभराच्या कमाई पेक्षा जास्त दंड भरावा लागत आहे. त्यामुळे व्यापार यांची अवस्था 'आमदनी अठन्नी दंड भरा रुपय्या' अशी झाली आहे.
पालिका कर्मचाऱ्यांची पथक बाजारपेठेत दाखल होताच व्यापाऱ्यांच्या पोटात गोळा उठत आहे. चार-पाच ग्राहकाच्या एकदम दुकानात शिरताच, वसुली पथक दत्त म्हणून हजर होते. सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. परंतु, काही ग्राहक सायंकाळी पावणे पाच वाजता किराणा दुकानांमध्ये यादी घेऊन येतात. त्यांना सामान देऊन, बाहेर येईपर्यंत पाच वाजतात. दुकाने बंद करण्यास पाच दहा मिनिटे उशीर झाला. तर, दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. दिवसभराची कमाई दंडात गमवावी लागते. त्यामुळे व्यापारी वर्ग हैराण झाला आहे. शनिवारी (ता. ४) सायंकाळी राहुरी पालिकेसमोर नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. पालिकेचे काही कर्मचारी जाणीवपूर्वक टार्गेट करीत असल्याचे, व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे काटेकोर पालन करून, व्यवसाय करीत असतांना किरकोळ कारणांमुळे व्यापाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी मंत्री तनपुरे यांनी लक्ष घालावे. अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली.
राहुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख म्हणाले, बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यासाठी पालिकेने सायंकाळी पावणेपाच व पाच वाजता असे दोनदा भोंगा द्यावा. पाचनंतर कोणताही दुकानदार ग्राहकांना सामान देत नाही. दुकानात गर्दी असेल. तर कारवाईला हरकत नाही. परंतु, दुकानातील मजूरांना रोजचा पगार व गल्यातील रक्कम मोजून दुकानाचे शटर बंद करतांना पाच-दहा मिनिटे उशीर होतो. अशावेळी वस्तुस्थिती पाहून, पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करू नये. अन्यथा व्यापारी दुकाने बंद ठेवण्याच्या मनस्थितीत आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT