money  
अहिल्यानगर

"किसान सन्मान"च्या पैशांची वसुली, पात्र नसताना घेतला लाभ

विलास कुलकर्णी

प्रशासनातर्फे विविध बँकांमधून लाभधारकांची माहिती संकलित करण्यात आली. लाभार्थींची पडताळणी करून अपात्र लाभार्थींना योजनेच्या यादीतून हटविण्यात आले.

राहुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या निकषानुसार राहुरी तालुक्यातील अपात्र खातेदारांची यादी नावासह प्रसिद्ध करण्यात आली. अपात्र ९३३ खातेदारांनी घेतलेल्या ७८ लाखांची वसुली सुरू आहे. ही रक्कम तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन कृषी विभाग व तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ योजना सुरू केली.‌ लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट जमा होते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. (Recovery of money from Kisan Sanman Yojana)

योजना जाहीर झाली तेव्हाच योजनेचे निकष जाहीर करण्यात आले होते. तरीही अनेक अपात्र शेतकऱ्यांनी नोंदणी केली. लाभार्थींना शासनाकडून थेट बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरवात झाली. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर, अपात्र लाभार्थींचा शोध घेण्यात आला. शासकीय नोकरीत कुटुंबातील सदस्य, जमीन शेती करण्यायोग्य आहे; परंतु तिचा वापर अन्य कारणांसाठी केला जात आहे, एकाच कुटुंबातील पती-पत्नी लाभार्थी आहेत असे शेतकरी योजनेच्या निकषात पात्र नाहीत.

प्रशासनातर्फे विविध बँकांमधून लाभधारकांची माहिती संकलित करण्यात आली. लाभार्थींची पडताळणी करून अपात्र लाभार्थींना योजनेच्या यादीतून हटविण्यात आले. त्यांच्या खात्यांवर वर्ग झालेले पैसे आता परत घेतले जात आहेत.

पंतप्रधान सन्मान योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अपात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. घेतलेली लाभाची रक्कम शासनाकडे परत जमा करण्यासाठी संबंधितांनी सहकार्य करावे.

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

  • * एकूण अपात्र लाभार्थी, वसुलीची रक्कम (कंसात) : १६४४ (रुपये १,३९,४६,०००)

  • * वसुली झालेले लाभार्थी, वसूल केलेली रक्कम (कंसात) : ७११ (रुपये ६१,४६,०००)

  • * वसुलीचे शिल्लक लाभार्थी, वसुली राहिलेली रक्कम (कंसात) : ९३३ (रुपये ७८,००,०००)

    (Recovery of money from Kisan Sanman Yojana)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT