Good news: Remuneration for these three schemes will be available in advance 
अहिल्यानगर

खुशखबर ः या तीन योजनांचे मानधन मिळणार अॅडव्हान्समध्ये

आनंद गायकवाड

संगमनेर ः कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन लॉकडाऊनमुळे निराधार लाभार्थी यांना आर्थिक अडचण भासु नये, म्हणुन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे जून या तीन महिन्यांचे एकत्रित मानधन आगाऊ देण्यात येणार आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संबंधितांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरवात होणार आहे.

शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा पाच योजनांच्या 14 हजार 499 लाभार्थ्यांना यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.

संगमनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतुन 3 हजार 991, श्रावणबाळ योजनेतुन 5 हजार 452 लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने मानधन दिले जाते. यांना तीन महिन्यांचे मानधन आगाऊ मिळणार आहे. 
त्याबरोबर केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेतुन 3 हजार 878, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या 129 लाभार्थ्यांना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन योजनेतील 27 लाभार्थ्यांना नियमित अनुदान देण्यात येणार आहे.

केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश दिलेले आहेत. संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांना 4 कोटी 60 लाख 79 हजार 900 रुपये अनुदान देण्यात येणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

World Sparrow Day : ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ शहरातून हरवलेली चिऊताई पुन्हा कशी येईल?

राज्य सहकारी बँकेची ‘थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर; हजारो कोटींच्या कर्ज निपटाऱ्याला गती

Latest Marathi News Live Update : लोणावळा नगरपरिषदेत तणाव; नगराध्यक्षांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या कॅबिनला ठोकले टाळे...

SCROLL FOR NEXT