agitation Sakal
अहिल्यानगर

ज्योती देवरेंविरोधात महसूल कर्मचारी तसेच तलाठी संघटनेचे आंदोलन

मार्तंड बुचडे

पारनेर (जि. नगर) : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही कारभाराच्या विरोधात आज (ता. 25 ) तहसील कार्यालयतील कर्मचारी, तसेच मंडलअधिकारी व तलाठी यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. देवरे यांची बदली करा किंवा आमच्या सर्वांच्या एकाच वेळी बदल्या करा अशी मागणी करत या कर्माचा-यांनी आज आपले कामकाज बंद आंदोलन सुरू केले आहे.

आमदार निलेश लंके यांच्याविरोधात तहसिलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओक्लीपद्वारे तक्रार केली होती. त्या नंतर देवरे यांच्या विरोधातील चौकशी अहवाल उजेडात आला आहे. मात्र त्या नंतर तहसीलदार व कार्यलयीन कर्मचारी, मंडलअधिकारी व तलाठी संघटणेमधील वादही उफाळून आला आहे व आज त्यांनी देवरे यांच्या विरोधात काम बंदचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी व तलाठी मंडलअधिकारी ससंघटना यात सहभागी झाली आहे.या दोनही संघटनांनी या पुर्वीच निवेदन देऊन कामबंदचा इशारा दिला होता.कर्मचा-यांनी तहसीलदार देवरे यांची बदली करा नाहीतर आमच्या तालुक्याबाहेर बदल्या करा अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. या वेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे, तलाठी व मंडलाधिकारी संघटनेचे अध्यक्ष एस यु मांडगे, मंडळ अधिकारी सचिन पोटे, कोळी, शेकटकर, पंकज जगदाळे, कदम, पवार इत्यादी सर्व मंडळअधिकारी, अव्वल कारकून, महसुल सहायक, तलाठी बंधू भगिनी सामील झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivali News : कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Niphad Crime : अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी

Akola News : महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर; राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत तारखा जाहीर

Murlidhar Mohol : महापालिकेची निवडणूक वेळेत होईल; मुरलीधर मोहोळ यांचा दावा

Latest Marathi News Live Update: करवाढीवर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी

SCROLL FOR NEXT