Robbed the driver of the CM's private secretary 
अहिल्यानगर

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या ड्रायव्हरला पारनेरमध्ये लुटले, खासगी कामासाठी सरकारी वाहन

मार्तंड बुचुडे

पारनेर : ःनगर-पुणे महामार्गावर सुपेनजीक म्हसणे फाटा येथील टोलनाक्याजवळ असलेल्या गजानन कृपा पेट्रोलियम पेट्रोलपंपावर रात्रीच्या वेळी वाहनात झोपलेल्या सागर मोरे यांच्या वाहनाचा चालक अरूण भोले यास अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (ता. 8 ) पहाटे मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत माहिती अशी की, सागर मोरे यांचे सरकारी वाहनाचा (क्र. एम एच 03 डी ए 7081) चालक अरूण भोले (हल्ल्ली रा. वाशी नाका, चेंबूर, मुंबई, मुळ रा.खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) हा रविवारी सरकारी वाहनासह त्याच्या गावी बीड येथे गेला होता. तेथून तो आपले काम आटोपून रात्री मुंबईकडे निघाला असताना रात्री खूप उशीर झाल्याने तो नगर- पुणे महामार्गावर म्हसणे फाटा टोलनाक्य़ाजवळ असलेल्या समीर आंबे यांच्या पेट्रोल पंपावर गाडी लावून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झोपला.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे वाहनाजवळ आले. आवाज करून त्यांनी भोले यांना उठविले. त्यांना वाहनातून खाली उतरण्यास सांगितले. काही समजण्याअगोदरच त्यास बेदम मारहाण केली. त्यात भोले जखमी झाले. या वेळी चोरट्यांनी भोले यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची चैन व खिशातील सात हजार दोनशे रूपये काढून घेतले. त्यांनी भोले यांच्याकडून वाहनाची चावी घेऊन पोबारा केला.

याच दिवशी भोले यांना लुटल्यानंतर नगर-पुणे महामार्गावरच सुपे गावाजवळ असलेल्या दौलत पंपाजवळ चोरट्यांनी संजय नानोर (रा. डिग्रस, राहुरी) याच्या पीकअप वाहन चालकास अडवून त्यास मारहाण करीत लुटले. त्याच्याजवळील चार हजार रूपये काढून घेतले.

एक लाख 20 हजार रूपयांची सोन्याची चैन, दोघांकडील मिळून रोख नऊ हजार रूपये लुटल्याची गुन्हा सुपे पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे करीत आहेत.

सरकारी गाडी खासगी कामासाठी 

अरूण भोले यांनी मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहायक सागर मोरे यांच्या सरकारी गाडीवर चालक असल्याचे सांगितले आहे. मात्र, असे असेल तर सरकारी गाडी खाजगी कामासाठी थेट मुंबई येथून बीडला कशी गेली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT