political news esakal
अहिल्यानगर

नेत्यांच्या भूमिकेने कार्यकर्त्यांच्या निष्ठा खुंटीला!

संजय काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : पंचायत समिती उपसभापती निवडीत पदाधिकाऱ्यांनी निष्ठा खुंटीला अडकवली. यापूर्वीही अशा घटना तालुक्यात विविध संस्थांच्या निवडीत झाल्या आहेत. अविश्वास ठराव, सह्यांचे अधिकार काढणे, असल्या प्रकारांचा जनकच हा तालुका आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. फोडाफोडीला नेत्यांचा कार्यकर्त्यांवरचा कमी झालेला वचक व अर्थकारण आहे. तथापि, बहुतेक नेतेच त्यांची निष्ठा न ठेवता कायम दुटप्पी वागत असल्याचा हा परिणाम असल्याचे जाणवते.

नेत्यांनी बोध न घेतल्यास दुसरी फळी वेगळ्या वळणावर जाणार

काँग्रेस आघाडीचा उपसभापती होणार, हे निश्चित असताना प्रत्यक्षात उलटेच घडले. भाजपचे दोन सदस्य फुटले व त्यानंतर काँग्रेस आघाडीचे दोन फोडण्यात आले. हे सगळे कशामुळे झाले, याविषयी आता राजकीय मंथन सुरू झाले आहे. फुटलेल्या सदस्यांना दिलेल्या बक्षिसांचा चर्चेतील आकडा भला मोठा आहे. समितीत जेवढा निधी पाच वर्षांत येत नाही, त्यापेक्षा जास्त खासगी निधी मिळाला, तर काय बिघडते, असा सूर काल होता.

झाले गेले गंगेला मिळाले, अशी चर्चा नेते, कार्यकर्ते लगेच करू लागले आहेत. यापूर्वी पंचायत समितीत अशीच फूट भाजपत पडून राष्ट्रवादीचा सभापती झाला होता. नगरपालिकेत तर गेल्या पंचवार्षिकला दोन वेळा अल्पमतात असणाऱ्या भाजप नगरसेवकांनी काँग्रेस फोडून खुलेआम सत्ता हस्तगत केली होती. श्रीगोंदे कारखान्यात भक्कम बहुमतात असणाऱ्या अध्यक्षांचे सह्यांचे अधिकार काढण्याची घटनाही राज्यात पहिल्यांदाच घडली होती. चाळीस वर्षांपूर्वी पंचायत समिती सभापतिवर अविश्वास आणण्याची घटनाही येथेच घडली होती.

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मात्र बळी

ही परंपरा असली, तरी सध्याचा काळ वेगळा आहे. आज हे का घडले, यावर चर्चा होऊ लागली आहे. त्यात प्रकर्षाने पुढे येणारा मुद्दा हा नेत्यांच्या लवचिक धोरणाचा आहे. आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, घनश्‍याम शेलार, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार या सगळ्यांनी पक्ष आणि गट-तट बदलले आहेत. नेत्यांच्याच निष्ठा जागी नाहीत, तर कार्यकर्त्यांवर त्यांचा वचक कसा राहणार, हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर चालल्याचे दिसते. राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठी हे सोयीचे आहे की धोक्याचे, हे काळ ठरविणार असला, तरी श्रीगोंद्याच्या या राजकारणात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मात्र बळी जात आहे, हे वास्तव कुणीही नाकारणार नाही.

नेत्यांची सेटलमेंट थांबवावी...

अनेक निवडणुकांत नेतेच कार्यकर्त्यांचा बळी देऊन सेटलमेंट करीत असल्याचे पुढे आले आहे. कार्यकर्त्यांना सालकरी गडी असल्याची वागणूक दिली जात असल्याची भावना होते. नेते सांगतील ती पूर्व दिशा ही भूमिका घेण्याचे दिवस कधीच संपले आहेत. नेत्यांच्या अशा वागण्यामुळे कार्यकर्ते साजन पाचपुतेंसारख्या नव्या चेहऱ्यांकडे आता पाहू लागल्याचे लक्षात येते. साजन यांची राजकारणातील अशा पद्धतीची एन्ट्री ही अनेकांसाठी धोक्याची घंटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT