कुकडी कालवा ई सकाळ
अहिल्यानगर

"कुकडी"चे लांबले, सीना धरणातून आवर्तन सुटले

नीलेश दिवटे

कर्जत : कर्जत, श्रीगोंदे आणि आष्टी तालुक्‍यासाठी वरदान ठरलेल्या सीना धरणातून (Seena Dam) दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे उन्हाळी पिकांना जीवदान मिळण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. मात्र, कुकडीचे आवर्तन कधी सुटणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील वर्षी चांगले पर्जन्यमान झाले. त्यामुळे सीना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत नगदी पिके आणि फळबागांना प्राधान्य दिले. विहिरी आणि कूपनलिकांनी मार्चमध्येच तळ गाठला. त्यानंतर ही पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

(Rotation for agriculture released from Sina dam)

रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने पाहिले आवर्तन सुटल्याने पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे पिकाची वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर ऐन गरजेच्या वेळी दुसरे आवर्तन सुटल्याने उन्हाळी पिके, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

आमदार रोहित पवार यांनी शब्द पाळला असून या वर्षी हंगामात दोन आवर्तन सोडण्यात येतील, असे दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी आमदार पवार यांनी सीना धरणावर लाभक्षेत्रातील शेतकरी व संबंधित अधिकारी यांची नियोजन पूर्व बैठक घेतली होती.

शेती आणि शेतकरी समृद्ध व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेत शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांची नियोजनाबाबत कार्यक्षेत्रावर बैठक घेतली होती. तसेच गरजेच्या वेळी आवश्‍यकतेनुसार पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले.

- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

(Rotation for agriculture released from Sina dam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावतीमधील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT