grocery shops
grocery shops File Photo
अहमदनगर

दुकान उघडायचंय मग आरटीपीसीआर करा, नगर महापालिकेचा हुकूम

अमित आवारी

नगर ः नगर महापालिका क्षेत्रात ज्या अस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी आहे, तेथील चालक व कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. दक्षता पथके व प्रभाग समिती कार्यालये या आस्थापनांची तपासणी करणार आहे. ज्यांच्याकडे चाचणी रिपोर्ट नसेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे. (RTPCR test mandatory for shopkeepers in Ahmednagar)

लॉकडाउन काळात ज्या अस्थापना सुरू आहेत, तेथील चालक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. नगर महापालिकेच्या आरोग्य केंद्रात त्यासाठी विनामूल्य आरटीपीसीआर चाचणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या आस्थापनांकडे हे रिपोर्ट नसतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका उपायुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

आरटीपीसीआर चाचणी संदर्भात अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त संतोष लांडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. चौकाचौकांत, तसेच संपूर्ण प्रभागात परवानगी नसताना भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

नागरिकांना संसर्ग होऊ नये, त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी या चाचण्या बंधनकारक केल्याचे सहायक आयुक्‍त संतोष लांडगे, दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान यांनी संगितले.(RTPCR test mandatory for shopkeepers in Ahmednagar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT