rupali chakanakar  rupali chakankar
अहिल्यानगर

मुलीवरील अत्याचाराचा खटला ‘फास्ट ट्रॅक’मध्ये चालवा : रुपाली चाकणकर

आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : विकृतीचा नायनाट करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन करताना.. स्वतःच्या पोटच्या गोळ्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात जात असल्याची तीव्र प्रतिक्रीया राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

गुरुवार ( ता. 30 ) रोजी रात्री उशिरा संगमनेर येथील भेटी दरम्यान त्यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात जावून, साडेअकरा वर्ष वयाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची माहिती पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्याकडून घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रीया व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, या खटल्याचे कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस करीत आहे. त्या अभागी मुलीला लवकर न्याय मिळाला तरच अशा विकृत प्रवृत्तीला जरब बसेल. हे कायद्याचे राज्य आहे, पोलिस त्यांचे काम चोख करताहेत याचे समाधान आहे. मात्र ज्या वेळी बापाला मुलीचं नातं समजत नसेल अशा घटनांच्या वेळी सर्व समाजघटकांनी एकत्र येवून अशा प्रवृत्तीचा नाश कऱण्याची गरज आहे. एखादी घटना घडल्यानंतर कँडल मार्च, चर्चा, आंदोलने केली जातात. मात्र अशी एखादी घटना घडून गेल्यानंतर काय हा प्रश्न अनुत्तरीत राहत असल्याकडे लक्ष्य वेधून यासाठी समाज प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नगर जिल्हा सरचिटणीस सचिन मुजगुले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2027 ची तयारी जोरात! भारतीय संघ स्पर्धेपूर्वी तगड्या संघाविरुद्ध खेळणार ६ वन डे; RO-KO ला कोण रोखणार?

डोरेमॉन पहिल्यांदाच थिएटरमध्ये! नोबिता, शिझुका, जियान पुन्हा एकदा एकत्र, समुद्राखालील मशीनची हटके स्टोरी

Navi Mumbai: बेलापूर ते उलवे जागेची टंचाई, एक एकर जमिनीचे दर तब्बल ६ कोटी रुपये

Water Crisis : जिल्ह्यात ७६ गावे, २३ वाड्यांची तहान टँकरवर ;छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर तालुक्यांत अधिक भीषण स्थिती

Pune News: कोंडीतून सुटकेचा ‘उड्डाणमार्ग’; पुणे महापालिकेकडून पाच महत्त्वाच्या पुलांची कामे पूर्णत्वास, नवीन वर्षात मिळणार दिलासा

SCROLL FOR NEXT