Sai heard the prayers of actress Behre 
अहिल्यानगर

प्रार्थना बेहरेची साईंनी ऐकली प्रार्थना, म्हणून करते शिर्डीत बर्थ डे

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी ः "मितवा' प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या चित्रफितीची साई समाधीवर पूजा करण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी मला कुणी अभिनेत्री म्हणून ओळखलेही नव्हते.

"मितवा' हिट झाला, अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. ही किमया साईबाबांमुळे घडली. तेव्हापासून माझा वाढदिवस शिर्डीत साजरा करते, अशा शब्दांत मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने भावना व्यक्त केल्या. 

कोविडचे सावट असतानाही, तिने साईनगरीत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली. येथील हॉटेल उद्योजक दिलीप वाकचौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सर्वांचे स्वागत केले.

प्रार्थना म्हणाली, की नव्या वर्षाची सुरवात आणि वाढदिवस शिर्डीत साजरा करायला आवडते. कोविडमुळे सर्वांना काळजी वाटत होती. साईदर्शन घेताना एरवीची गडबड, गोंगाट नसल्याने शांतपणे दर्शन घेता आले. त्यामुळे पती अभिषेक यांच्यासह कुटुंबातील सर्वांनाच आनंद वाटला. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: झुंबरची लाईट बंद म्हणजे ‘नो एंट्री’; ‘इशाऱ्यावर चालणारा’ स्टाफ... अशोक खरातच्या ‘कोड वर्ड’मागचं घाणेरडं सत्य उघड!

दिव्यांगांसाठी मोठा निर्णय! महाराष्ट्रात २१ श्रेणींना सरकारी योजनांचा लाभ मिळणार; राज्य सरकारची ऐतिहासिक घोषणा

Sangli : गाजावाजा न करता लग्न उरकण्याची अट, पहिल्याच रात्री नवरी पळाली; नवरदेवाला १० लाखांचा चुना

"आताच्या मुली तीन लाख रुपये पर डे घेतात आणि आम्ही.." उषा नाडकर्णींनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : शेतीच्या वादातून थोरल्या भावाने वडिलांबरोबर धाकट्या भावालाही मारून टाकलं

SCROLL FOR NEXT