Sai Sansthan has not published a diary or calendar this year 
अहिल्यानगर

यंदा साई संस्थानची डायरी, कॅलेंडर नसल्याने भाविकांत नाराजी

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः दरवर्षी दसऱ्याला प्रकाशित होणारी साईसंस्थानची नव्या वर्षाची डायरी व दिनदर्शिका यंदा प्रकाशित झाली नाही. आणखी 15-20 दिवस ती प्रकाशीत होण्याची सूतराम शक्‍यता नाही.

भाविकांकडून मोठी मागणी, छपाईसाठी निधी आणि मंजूर झालेल्या निविदा, सर्व काही तयार आहे. मात्र, आजवर कागदी घोडे नाचविण्यात वेळ वाया गेला. त्यामुळे गेल्या 45 वर्षांत साईसंस्थानवर पहिल्यांदाच डायरी, दिनदर्शिका उपलब्ध नसल्याची सांगण्याची वेळ आली. 

मागील वर्षी सव्वादोन लाख डायऱ्या व सव्वातीन लाख दिनदर्शिकांची विक्री झाली. छपाईसाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च आला. यंदा प्रकाशनास तीन महिन्यांचा विलंब झाला. त्यामुळे डायऱ्यांची संख्या दीड लाख, दिनदर्शिकांची संख्या दोन लाखांपर्यंत कमी केली. नव्या वर्षाचा पहिला महिना संपेपर्यत छपाई पूर्ण होणार नसल्याने विक्रीत आणखी घट होण्याची शक्‍यता आहे. 

तदर्थ समितीने 11 मे 2020 रोजी सुमारे 4 कोटी 97 लाख रुपये खर्चाच्या साहित्य छपाईस मान्यता दिली. उच्च न्यायालयाची परवानगी घेण्याची सुचनाही केली. साईसंस्थानच्या विधी व न्याय विभागाने उच्च न्यायालयासमोर प्रस्ताव ठेवला. 23 जुलै 2020 रोजी तो बोर्डावर आला.

खरे तर संस्थानच्या न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या विभागाने पाठपुरावा करून न्यायालयाची मंजुरी घ्यायला हवी होती. मात्र, 27 ऑक्‍टोबरपर्यत मंजुरी मिळविता आली नाही. एरवी ऑक्‍टोबरमध्येच डायरी व दिनदर्शिकांचे प्रकाशन होते. इंग्रजीतील डायऱ्यांना सर्वाधिक मागणी असते. 

तदर्थ समितीला 50 लाखांपर्यंत खर्च करण्याचा अधिकार आहे. तेवढ्या किंमतीचे साहित्य छापण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. इकडून तिकडे फिरला आणि तसाच पडून राहिला. शेवटी 21 डिसेंबरला निविदा प्रसिद्ध झाली. मात्र, छपाईची वेळ आली, तरी डायरीचा अंतिम मसुदा तयार होईना. मग निविदेला मुदतवाढ दिली. अखेर 14 जानेवारीला निविदा उघडली, छपाईचे काम कुणाला द्यायचे, एकदाचे नक्की झाले. अहमदनगर

 साईसंस्थानची 45 वर्षांपासून दसऱ्याला डायरी व दिनदर्शिका प्रकाशीत करण्याची परंपरा यंदा खंडीत झाली. संसदेतील सहकारी खासदार व राज्यातील काही मंत्रीही विचारणा करीत आहेत. संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेतली असून, भाविकांना केंद्रस्थानी ठेवून कामकाज व्हायला हवे. 
- खासदार सदाशिव लोखंडे 

साईसंस्थानची दिनदर्शिका व डायरी लवकरच प्रकाशित होईल. यंदाची डायरी सर्वाधिक सुबक व वैशिष्ट्यपूर्ण असेल, हे आपण खात्रीने सांगू शकतो. 
- कान्हूराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान 
 
साईमंदिर खुले झाल्यापासून अडीच महिने अधिकाऱ्यांकडे होते. एक जानेवारीला दिनदर्शिका व डायरी प्रसिद्ध करणे सहजशक्‍य होते. मात्र, 45 वर्षांची परंपरा खंडीत झाल्याचे वाईट वाटते. कामांचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा. त्याकडे दुर्लक्ष झाले, की असे प्रकार होतच राहणार. 
- संजय काळे, माहिती अधिकार कार्यकर्ते 
--- 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT