sai sansthan esakal
अहिल्यानगर

साईसंस्थान विश्‍वस्तनिवड पुन्हा लांबणीवर; 2 आठवड्यांची मुदत

सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि.अहमदनगर) : राज्य सरकारने (ता.२६) साईसंस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून दोन आठवड्यांची मुदत मागवून घेतली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला नव्या मंडळाच्या नियुक्तीचा घोळ आणखी दोन आठवडे लांबणीवर पडला आहे. सध्या साईसंस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची नियुक्ती करावी, या जनहित याचिकेवर येत्या शुक्रवारी (ता. ३०) सुनावणी होणार आहे. (Sai-Sansthan-trust-election-postponed-again-marathi-news-jpd93)

विश्‍वस्तनिवड पुन्हा लांबणीवर

साईसंस्थानचे माजी विश्‍वस्त उत्तमराव शेळके, माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे व संदीप कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी ही मुदतवाढ देण्याची विनंती न्यायालयास केली. त्यानंतर न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांनी ही मुदतवाढ दिली.

आजच्या न्यायालयीन कामकाजाबाबत माहिती देताना अॅड. तळेकर यांचे सहायक वकील अजिंक्य काळे यांनी सांगितले, की याचिकाकर्त्यांनी विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी करण्यात आलेल्या सुधारणांना आव्हान दिले आहे. संभाव्य नव्या मंडळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, अवैध धंदे करणारे, सरकारची फसवणूक करणाऱ्यांची नावे दिसत आहेत. सोळा विश्वस्तांचे वाटप तीन राजकीय पक्षांनी करून घेतले आहे. निवडीचे निकष शिथिल करण्यात आले आहेत, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या आक्षेपांवरदेखील येत्या शुक्रवारी (ता.३०) सुनावणी होईल. दरम्यान, नव्या मंडळात स्थानिक विश्वस्तांची संख्या निम्मी असावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणीदेखील याच वेळी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: हार्बरवर जलद लोकल धावणार, मोठी माहिती आली समोर; रेल्वे प्रशासनाने काय सांगितलं?

India Africa Trade: संधी मोठी पण आव्हाने गंभीर! भारत-आफ्रिका व्यापार वाढीच्या मार्गात 8 मोठे अडथळे

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्स न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? वैभव सूर्यवंशीचे स्वप्न अपूर्ण राहणार... नेमकी भानगड काय?

Indigo-Air India: विमान प्रवास महागण्याची शक्यता! एअर इंडिया-इंडिगोची उड्डाण कपात; कारण काय? प्रवाशांना मोठा फटका

"त्यावेळी फॅनने स्वतःचा जीव घेण्यापासून रोखलं" प्रवीण तरडेंनी सांगितली स्ट्रगलची भयंकर आठवण

SCROLL FOR NEXT