Sakal Impact esakal
अहिल्यानगर

Sakal Impact : मोरयाचिंचोरे तलावात पाण्याची आवक; शेतकऱ्यांमध्ये समाधान; अखेर तहान भागली

तसेच येथील जंगलातील हरीण, काळवीट व इतर लहान पशुपक्षांची आता तहान भागली जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोनई : मोरयाचिंचोरे येथील तळ्याने तळ गाठल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच वांबोरी चारी यंत्रणेच्या माध्यमातून बंद नलिकेतून मोरयाचिंचोरे तलावात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जनावरांचा व माणसांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच येथील जंगलातील हरीण, काळवीट व इतर लहान पशुपक्षांची आता तहान भागली जाणार आहे.

यावर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाल्याने मोरयाचिंचोरे, लोहगाव, धनगरवाडी भागात नोव्हेंबर महिन्यातच शेती व पिण्याच्या पाण्याची चणचण जाणवू लागली. येथील तळ्याने तळ गाठल्याने उन्हाळ्याची चिंता लागली होती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणून येथील सद्यस्थिती ‘सकाळ’मधून मांडण्यात आल्यानंतर संबंधित विभागाने वांबोरी चारीच्या बंद नलिकेतून तलावात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

हा संपूर्ण परिसर अनेक वर्षांपासून जिरायत पट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. येथील परिसरात आमदार शंकरराव गडाख व माजी सभापती सुनील गडाख यांच्या प्रयत्नांतून जलसंधारणाचे काम करण्यात आल्याने अलिकडच्या सहा ते सात वर्षांत परिसर हिरवागार दिसू लागला आहे. सध्या कपाशी मोडल्यानंतर पुढे काय हा प्रश्न आहे. ऊस व कांद्याच्या लागवडी थांबल्या आहेत. जनावरे व पिण्याच्या पाण्याकरिता तलावात पाणी सोडावे, अशी मागणी होत होती.

तलावात पाणी सोडले. मात्र, त्यावर संबंधितांचे लक्ष नसल्याने आवक खूपच कमी आहे. असेच चित्र राहिले, तर उपयोग होणार नाही.

- विष्णू इलग, ग्रामस्थ, मोरयाचिंचोरे

मुळा धरणातून असलेल्या बंद नलिका वांबोरी चारीमधून धनगरवाडी, मोरयाचिंचोरे व कात्रड येथील तलावासाठी पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली. वरून कमी, अधिक पाणी येत असल्याने अडचण येत आहे.

- बाळासाहेब थोरात, मोजणीदार, वांबोरी चारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT