sambhaji nagar esakal
अहिल्यानगर

रोजगार हमीत भोंगळ कारभार; यंत्राने कामे करून कागदोपत्री मजुरांनी केली दाखविल्याचा प्रकार

कामाचे शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या कुटुंबांची संख्या १ लाख ३० हजार

रुपेश नामदास

छत्रपती संभाजीनगर: राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कामाचे शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या कुटुंबांची संख्या १ लाख ३० हजार ३७ एवढी असून अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २४ हजार ८६९ तर त्या खालोखाल पालघर १३ हजार ६६२, बीड जिल्ह्यात १० हजार ४७ कुटुंबांची संख्या आहे.

रोजगार हमीअंतर्गत कुटुंबांना अकुशल स्वरूपाची कामे उपलब्ध होताहेत. ग्रामीण भागात ज्यांना रोजगाराची जास्त साधने उपलब्ध नसताना अशांसाठी रोजगार हमी योजना फायद्याची ठरते. मात्र, कमी पैसे मिळत असल्याने यात शंभर दिवस पूर्ण करणाऱ्यांची संख्या कमी आहे.

रोहयोसाठी राज्यात कोट्यवधींचा निधी

महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये महाराष्ट्रासाठी १ हजार ७२३.२५ कोटी, २०२०-२१ १ हजार ६३८.७८, २०२१-२२ मध्ये २ हजार ९३.७२ कोटी, २०२२-२३ या वर्षात २ हजार ३४६.५७ कोटी रुपये जारी करण्यात आले. मागील चार वर्षांत महाराष्ट्रात निधी जारी होण्याचा आलेख हा चढता आहे.

देशात २०२२-२३ या वर्षात उत्तर प्रदेश ९ हजार ९३२,५५, राजस्थान ८ हजार ८१९, तमिळनाडू ८ हजार ६४१.६७, आंध्रप्रदेश ६ हजार ७०६.८, कर्नाटक ६ हजार १३३.५९, बिहार ५ हजार ८७८.५४, मध्यप्रदेश ५ हजार ६६९.५७ कोटी रुपये जारी (इश्यू) करण्यात आले.

राज्यात दरवर्षी तीन लाखांच्या पुढे कामे पूर्ण

रोजगार हमीतून महाराष्ट्रात २०१७-१९ मध्ये २ लाख ४३ हजार ४७९, २०१८-१९ मध्ये ३ लाख २४ हजार ३५३, २०१९-२० मध्ये ३ लाख ३५ हजार ३६०, २०२०-२१ मध्ये २ लाख ६२ हजार १६४ तर २०२१-२२ मध्ये २ लाख ३१ हजार ८२० कामे पूर्ण करण्यात आली.

२०२१-२२ या वर्षात नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, जळगाव, गोंदिया, धुळे, बुलडाणा, अकोला, नगर जिल्ह्यांत सर्वाधिक कामे पूर्ण करण्यात आली. २०२० पासून रोहयोचे कामे पूर्ण करण्यात घट झाली आहे.

काही ठिकाणी यंत्राने कामे

रोजगार हमी योजनेच्या नावाखाली काही ठिकाणी यंत्राने कामे केल्याच्या तक्रारी येतात. कामे तर रोजगार हमी योजनेतून करायची असतात मात्र काही ठिकाणी रोजगार कामावर येतच नाही. त्यामुळे कामे यंत्राने पूर्ण करून ती कागदोपत्री मजुरांना केली असे दाखविल्याचे प्रकार घडले आहे. काही गावांत मजूर रोजगार हमीची कामे करण्यापेक्षा इतर ठिकाणी रोजंदारीवर जाणे पसंत करतात. त्यामुळे रोहयोचे शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या कुटुंबाची संख्या कमी भरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT