Sand thieves vehicles have been auctioned in Kopargaon.jpg
Sand thieves vehicles have been auctioned in Kopargaon.jpg 
अहमदनगर

वाळूचोरांच्या वाहनांचा लिलाव; कोपरगावच्या महसूल विभागाने बारा लाख रुपये केले वसूल

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव (अहमदनगर) : गोदावरीच्या पात्रातून चोरटी वाळूवाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचा महसूल विभागाने मंगळवारी लिलाव केला. त्यातून तब्बल 12 लाख रुपयांची वसुली झाली. उर्वरित वाहनधारकांनी सात दिवसांत दंड न भरल्यास लिलाव करण्याचा इशारा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिला आहे.

सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारले अन... 
 
महसूल पथकाने 2016 पासून वाळूउपसा करताना शेकडो वाहने जप्त केली होती. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, मालकांनी दंड भरला नाही. त्यामुळे 74 लाख 50 हजार रुपये दंडाच्या वसुलीसाठी 29 वाहनांचा तहसील कार्यालयात मंगळवारी लिलाव करण्यात आला. त्यात सात डंपर, दोन जेसीबी, 16 ट्रॅक्‍टर, दोन ट्रक, तसेच दोन पिक-अपचा समावेश आहे. लिलावात कोपरगावसह वैजापूर, येवला, नाशिक, मालेगाव, श्रीरामपूर येथील नागरिक सहभागी झाले होते. मंगळवारी 29 पैकी सहा वाहनांचा लिलाव झाला. त्यातून 12 लाख रुपयांची वसुली झाली.
 
यापूर्वी गेल्या वर्षी जूनमध्ये 32 वाहनांचा लिलाव करून 82 लाखांचा दंड वसूल केला होता. आणखी 70 वाहने धूळ खात पडून आहेत. उर्वरित वाहनांचा एप्रिलमध्ये लिलाव होणार आहे. वाळूचोरांनी दंड न भरल्यास व वाहनांचा लिलाव न झाल्यास ती भंगारात विकणार असल्याचे तहसीलदार चंद्रे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT