Gold crime  sakal
अहिल्यानगर

Sangamner Crime :बनावट सोने तारण प्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा

या प्रकरणी शाखाधिकारी सुदाम शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर- प्रवरा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेत गोल्ड व्हॅल्युअरने आठ कर्जदारांच्या मदतीने ३८ लाख ४४ हजार ४२२ रुपयांना फसविले.

या प्रकरणी शाखाधिकारी सुदाम शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवरा बँकेच्या संगमनेर शाखेतील सोनेतारण कर्ज प्रकरणातील सोन्याचे मूल्यांकन करण्यासाठी जगदीश शहाणे यांची गोल्ड व्हॅल्युअर म्हणून नियुक्ती केली होती.

मागील वर्षभरात त्यांनी आठ कर्जदारांना हाताशी धरुन, सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवले. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने याबाबत कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्यानुसार जगदीश शहाणे (एकता चौक, मालदाड रोड), भानुदास ढगे (पिंपळगाव खांड, ता.अकोले), गोरक्ष गाडेकर (मनोली ), सुधीर घुगे (घुलेवाडी), मारुती मंडलिक (रायतेवाडी फाटा), शरद पर्बत (ढोलेवाडी), राहुल गुरकुले (संगमनेर खुर्द ), सुशील रोहम ( निमगाव टेंभी) सह एक महिला अशा नऊ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

Latest Marathi Breaking News Live Update : इंदिरानगरमध्ये भोंदू बाबाचा घोटाळा उघड: महिलेला धमक्या देत ५० लाखांची फसवणूक

Devendra Fadnavis : मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा; मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुढाकार; मेडिकलला येतोय कॉर्पोरेट लूक!

Solapur Politics:'दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्‍ये प्रवेश'; पक्ष बळकटीचे दिले आश्वसन..

'जुबेरच्या संपर्कातील संशयितांवर एटीएसचा वॉच'; १५ जणांच्या कसून चौकशीनंतरचे पथक पुण्याला रवाना, बरच काही सापडलं?

SCROLL FOR NEXT