In Sangamnera, now even the police force is affected 
अहिल्यानगर

संगमनेरात आता पोलिसदादाही बाधित...सव्वासातशेजणांना लागण

आनंद गायकवाड

संगमनेर ः गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील दोन महिला कर्मचाऱ्यांसह चार पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे रॅपिड अँटीजेन चाचणित स्पष्ट झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली होती. त्यात आज सकाळच्या सत्रातील अहवालात संगमनेर शहरातील 13 जणांसह तालुक्यातील पाचची भर पडल्याने तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या 723 झाली आहे.

संगमनेरच्या स्थानिक आरोग्य यंत्रणेने आज घेतलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील रंगारगल्लीतील 6 रुग्ण समोर आले आहेत. बुधवार ( ता. 29 ) रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील कारागृहातील 46 आरोपींपैकी तब्बल 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

त्यांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन गुरुवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यातील 4 अधिकार्‍यांसह 46 कर्मचार्‍यांची मालपाणी लॉन्स येथील चाचणी केंद्रावर तपासणी करण्यात आली. यात 31 व 39 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय दोन महिला पोलिस कर्मचारी संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आज करण्यात आलेल्या चाचणीत शहरातील रंगार गल्ली, माळीवाडा, मालदाड रोड, पद्मनगर, जनता नगर व पोलिस वसाहतीसह तालुक्यातील आश्‍वी खुर्दमध्ये पहिल्यांदाच कोविडने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. तसेच निंबाळे, कनोली व गुंजाळवाडीचा समावेश आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तालुक्याचा कोरोना बाधितांचा आकडा तब्बल 723 झाला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT