Sarpanch became a doctor in Anna's village 
अहिल्यानगर

अण्णांच्या गावात डॉक्टर झाले सरपंच

एकनाथ भालेकर

राळेगण सिद्धी : आदर्श गाव राळेगणसिद्धीच्या सरपंचपदाच्या निवडीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवताना काही लोकांना पकडण्यात आले होते. त्यामुळे येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत नेमके काय होते, कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडते, याकडे सर्वांच्या नजरा होत्या.

सरपंचपदी डॉ. धनंजय पोटे तर उपसरपंचपदी अनिल मापारी यांची बिनविरोध निवड झाली.

राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सरपंच पदासाठी डॉ. धनंजय पोटे, तर उपसरपंच पदासाठी अनिल मापारी यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिदास पवार यांनी जाहीर केले.

सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवक राजेंद्र कंदलकर, भाऊसाहेब पोटघन व सागर हजारे यांनी सहकार्य केले. 
डिजिटल ग्रामपंचायत, गावात वैद्यकीय सुविधा, वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्याचे प्रश्न, वाडी वस्तीवरील रस्ते आदी प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, गेल्या 45 वर्षांत हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धीच्या विकासकामांची घौडदौड सुरू आहे. ती या पुढील काळात अशीच सुरू राहील. आमचा कोणताही पक्ष नव्हता. यापुढील काळात जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास आम्ही दोन्ही गट एकत्र येऊन काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरपंच व उपसरपंच निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची व फटाक्यांची अतिषबाजी करत आनंद साजरा केला. निवडीनंतर सरपंच व उपसरपंचानी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट आशिर्वाद घेतले. त्यानंतर गावातील ग्रामदैवत माता पद्मावती देवीचे तसेच यादवबाबांचे दर्शन घेतले. 

यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेष औटी, डॉ. गणेश पोटे, उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे, सुनील हजारे, शरद मापारी, रामदास उगले, संपत उगले, कांतीलाल मापारी, संपत पोटे सर, रमेश औटी, रूपेश फटांगडे, सदाशिव पठारे, नानाभाऊ मापारी, किसन मापारी, किसन पठारे, भाऊसाहेब गाजरे आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT