School rooms should be sanitized by the teacher bank 
अहिल्यानगर

शाळाखोल्या शिक्षक बॅंकेकडून  सॅनिटाइझ करून घेण्याचा ठराव 

सकाळ वृत्तसेवा

नगर  : जिल्ह्याबाहेरून आलेल्यांना विविध शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा प्राथमिक शिक्षक बॅंकेकडून सॅनिटाइझ करून घ्याव्यात, असा विनंतीवजा ठराव शिक्षण समितीच्या सभेत संमत झाला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, धनराज गाडे, विमल आगवण उपस्थित होते. 

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे शाळा सुरू करताना सर्व शाळा सॅनिटाइझ कराव्यात. जिल्हा बॅंकेकडून या वर्षी निव्वळ नफ्यावरील एक टक्का रक्‍कम घेण्याऐवजी सर्व शाळा सॅनिटाइझ करून घ्याव्यात, अशी चर्चा समितीच्या सभेत होऊन सर्वानुमते ठराव मंजूर झाला.

सभेत पाठ्यपुस्तके वितरणाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतरत्र पाठ्यपुस्तकांचे वितरण 100 टक्के झाले. जिल्ह्यातून स्थलांतरित होऊन आलेल्यांचे व विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण त्वरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाचवी व आठवीचे जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही उपाध्यक्ष शेळके यांनी केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT