Schools in Ahmednagar closed, Collector orders 
अहिल्यानगर

नगरमधील शाळा, शिकवण्याही बंद म्हणजे बंदच, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अद्यापि शाळा व महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. सरकार कोणताच निर्णय घेत नसतानाही जिल्ह्यातील काही शाळांनी पालकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवले जात आहेत. 

शाळा पालकांना त्यांच्या पाल्याचे आगामी वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरण्यास प्रवृत्त करीत आहेत. काही शाळांनी तर आपण वेळेत पैसे नाही भरले तर आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश रद्द करण्यात येईल, असा संदेशातून सज्जड इशारा पालकांना दिला जात आहे. 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांबरोबरच खासगी शिकवण्या बंद राहतील. या काळात शैक्षणिक संस्थांच्या कार्यालयातील कर्मचारी केवळ ई-सामग्री तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व निकाल जाहीर करणे हे कामकाज करण्यास परवानगी आहे. 

हाच कित्ता अनेक खासगी शिकवणी चालकांनीही सुरु केला आहे. शाळा सुरू होतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यात शाळांकडून सुरु झालेल्या या दबंगिरीला पालक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात शिक्षण विभागाकडे काहींनी तक्रारी करण्याच्या तयारी चालवली आहे. 

जिल्हाधिकाऱी राहुल द्विवेदी यांनी शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या बरोबरच खासगी शिकवण्याही घेण्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. फक्त ऑनलाईन पध्दतीने शिकविण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

शाळांचा अट्टाहास कशासाठी 
राज्य सरकारकडून शाळा व महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात अद्यापि ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तरीसुध्दा शाळांकडून पैसे भरून घेण्याचा अट्टाहास नेमका कशासाठी चालला आहे, असा सवाल आता पालकांमधून उपस्थित करून एकमेकांना विचारला जात आहे. 

शिक्षण विभागाकडून कानटोचणी कधी? 
जिल्ह्यातील अनेक शाळांनी मागील व आगामी शुल्क वसुली सुरू केली आहे. या बाबत काही पालकांनी शिक्षण खात्याकडे तोंडी तक्रारी केल्या असल्या तरी शिक्षण विभागाकडून त्यावर ठोस भूमिका घेतली नाही. शिक्षण विभागाने अध्यादेश काढून शाळांकडून होणारी शुल्क वसुली थांबविण्याची मागणी होत आहे. शिक्षण विभागाच्या बोटचेपे धोरणाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert: वडीवळे धरण ९० टक्के भरलं; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू; इंद्रायणी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार

Alandi Flood Update : आषाढी वारीपूर्वी आळंदीत पूरस्थिती, 'इंद्रायणी'ला महापूर, घाटांसह धर्मशाळा बुडाल्या; देवस्थान-पोलिसांकडून वारकऱ्यांना कडक सूचना

Asia Cup 2027 Dates: आशिया चषकाच्या तारखा समोर आल्या! भारताच्या विरोधानंतरही बांगलादेशात होणार स्पर्धा

SCROLL FOR NEXT