The second phase of the pig catching campaign was completed in Jamkhed city 
अहिल्यानगर

जामखेडमध्ये डुक्करांच्या बंदबस्ताचा दुसरा टप्पा यशस्वी; तामिळनाडुच्या पथकाची घेतली मदत

सकाळ वृत्तसेवा

जामखेड (अहमदनगर) : शहरात मुक्तविहार करणाऱ्या डुक्करे पकडण्याच्या मोहिमेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. आता 10 दिवसानंतर पुन्हा डुक्करांचा शोध घेऊन पालिका त्यांचा बंदोबस्त करणार आहे. तुर्तास डुक्करांच्या मुक्तसंचारापासून जामखेडकरांची सुटका झाल्याचे दिसत आहे. 

डुक्करांचा त्रास कायमस्वरूपी बंद व्हावा, यासाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी नियोजन केले आहे. 10 दिवसानंतर पुन्हा तमिळनाडू येथील निष्णात पथकास पाचारण केले जाणार आहे. डुक्करांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत टप्प्याटप्याने सुरुच राहणार आहे, हे मात्र निश्‍चित ! 

अनेकदा डुक्करांचा बंदोबस्त करा,अशा मागण्या व्हायच्या मात्र आश्वासनाखेरीज कार्यवाही काहीच होत नव्हती. यावेळी मात्र नगरपालिकेने गांभीर्याने घेतले आणि 'मिशन डुक्कर हटाव' हाती घेतले. याकरिता स्थानिक व्यक्ती अथवा कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता तामिळनाडूच्या निष्ष्णात २५ व्यक्तींना निमंत्रित करुन शिकार डुक्करांची मोहीम राबविली आणि तब्बल सहाशे दोन डुक्करांना पकडून तामिळनाडू दर्शन घडविले. या मंडळींनी त्या डुक्करांची त्यांच्या सोयीने विल्हेवाट लावली. 

दरम्यान सदर कार्यवाही संदर्भात मागील आठवड्यात 'सकाळ', ई-सकाळ या सकाळ समूहाच्या माध्यमातून व्रत्त प्रसिद्ध झाले आणि मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना राज्यभरातील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व आमदारांचे फोन आले. त्यांनी कार्यवाही संदर्भात माहिती जाणून घेतली आणि नगरपालिकेच्या निर्णयाचे कौतुक केले. 

जामखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते ठरणार विक्रमादित्य ! 

जामखेड नगरपालिकेत पाच वर्षाच्या काळात सोळा मुख्याधिकारी झाले. सतरावे मुख्याधिकारी म्हणून मिनीनाथ दंडवते सहा महिन्यापूर्वी हजर झाले.  त्यांनी हजर होताच अतिक्रमणावर हातोडा उगरला. अरुंद बनलेल्या रस्त्यातील अडथळे हटविले. आपलं शहर स्वच्छ सुंदर असावं याकरिता काम हाती घेतलं. 'माझी वसुंधरा' या अभियानात सहभाग नोंदविला. बावीस हजार झाडं लावण्याचे उद्दिष्ट घेऊन काम सुरू केले. डुक्कर मुक्त जामखेड करिता अभियान राबविले. तसेच कर वसूलीसाठी 'हलगी बादनाचा' अभिनव उपक्रम राबविला. असे एक नाही अनेक उपक्रम जामखेडमध्ये पहिल्यांदा राबविले गेले आणि यशस्वी झाले. त्यामुळे हे सर्व उपक्रम राबविणारे पहिले मुख्याधिकारी होण्याचा मान मिनीनाथ दंडवते यांना मिळाला. 

तामिळनाडू च्या पाहुण्यांचा ग्रामीण आरोग्य प्रकल्पात झाला पाहुणचार...! 

नगरपालिकेच्या या विशेष मोहिमेसाठी पाचारण केलेल्या २५ व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न नगरपालिकेच्या समोर होता. मात्र या सर्वांच्या सुरक्षित सर्व दिवस मुक्कामाची, जेवणाची उत्तम सोय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डॉ.शोभा आरोळे आणि स्थापत्य अभियंता रवी आरोळे या भावंडांनी केली. तसेच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली. त्यामुळे नगरपालिकेची खूप मोठी चिंता कमी झाली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

Scam Alert Kolhapur : गोलमाल है भाई गोलमाल है! एक गाव आणि चार भक्त निवास, आणखी दोन भक्त निवासासाठी ४० लाखांची मंजुरी

SCROLL FOR NEXT