The secretary of Kashti Seva Sanstha was suspended for this reason 
अहिल्यानगर

काष्टी सोसायटीच्या सचिवांना या कारणाने केले निलंबित

संजय आ. काटे

श्रीगोंदे : राज्यात अग्रस्थानी असलेल्या सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव सत्यवान बुलाखे यांना निलंबित करण्यात आलं आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी तसे काढले आहेत. बुलाखे हे गेली 24 वर्षे काष्टी सेवा संस्थेचे सचिव म्हणून काम करीत आहेत. तीन प्रकारचे आरोप ठेवून त्यांचे निलंबन केले आहे.

काष्टी सेवा संस्थेचे माजी व्यवस्थापक व संचालक मंडळात गेल्या काही महिन्यात वादंग झाले. त्यात व्यवस्थापल जालिंदर पाचपुते यांना बडतर्फ केल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले. तर पाचपुते यांच्या म्हणण्यानूसार त्यांनी राजीनामा दिला होता. हा विषय अजून ताजा असतानाच आता बुलाखे यांचे निलंबन झाल्याने काष्टी सेवा संस्थेतील कारभार पुन्हा चर्चेत आला आहे.

बुलाखे यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, त्यांनी बोगस कर्ज वितरण व कर्जमाफी केली आहे. त्यात संस्थेचे तत्कालिन व व्यवस्थापक यांच्या नातेवाईकांना बोगस कर्ज व कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. संस्थेच्या मालाची उधारीवर विक्री करणे, संस्थेची माहिती सादर न करणे असे अशा प्रकारचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. बुलाखे यांना तत्काळ पदमुक्त करुन आनंदा शिंदे यांना सचिवपदाचा पदभार देण्याचे आदेशात म्हटले आहे. 

कोणत्या अध्यक्ष, व्यवस्थापकास बोगस कर्ज दिले
बुलाखे यांना ज्या कारणांनी निलंबित केले आहे, त्यात त्यांनी नेमक्या कोणत्या अध्यक्षांना व व्यवस्थापकांना बोगस कर्जवाटप केले याचा उल्लेख आदेशात नाही. त्यामुळे या विषयाची वेगळी चौकशी होणार का याची उत्सुकता आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT