Yashwantrao Gadakh esakal
अहिल्यानगर

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी घेतला आमटी-भाकरीचा आस्वाद

विनायक दरंदले

सोनई (जि. नगर) : अध्यात्माच्या गोडीप्रमाणेच अन्नदानात असलेल्या गोडीची आठवण आली आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी सवंगड्यांसह सद्‍गुरू नारायणगिरी वारकरी शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. तेथे आमटी-भाकरीचा मनसोक्त आस्वाद घेतला. अध्यात्म व साहित्याची ही अपूर्व भेट भक्तांना चांगलीच भावली.

सद्‍गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक सोनई येथील जगदंबादेवी मंदिरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी गडाख यांनी आपल्या भाषणात, आश्रमातील आमटी-भाकरी व बेसनवडीची चव आजही जिभेवर रेंगाळत आहे, असे सांगितले. त्याचा धागा पकडत मंडलिक महाराजांनी आपल्या भाषणात गडाखांना आश्रमभेटीचे निमंत्रण दिले होते.
गडाखांनी आज नेवासे बुद्रुक येथील आश्रमास भेट दिली. तेथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, तुकाराम नवले, कारभारी वाखुरे, ॲड. काका गायके, अण्णासाहेब पटारे, बाळासाहेब कोकणे आदी उपस्थित होते. त्यानंतर आमटी-भाकरी, मिरचीचा ठेचा, बेसनवडीचा आस्वाद गडाख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला.

''महंत उद्धव महाराज आध्यात्मिक शिक्षणाला शालेय शिक्षणाची जोड देत पिढी घडवत आहेत. येथील प्रेम, आपुलकी व स्नेहभाव पाहून मनाला समाधान लाभले.'' - यशवंतराव गडाख, ज्येष्ठ साहित्यिक

''मनोबल व आत्मबल उत्तम असेल, तर संकटावर मात करणे शक्य होते, हे यशवंतराव गडाख यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी कठीण प्रसंगात उभ्या केलेल्या संस्था आज राज्यात नावारूपाला आल्या. हे ऋषितुल्य कार्य तालुक्यास भूषणावह आहे.'' - महंत उद्धव महाराज मंडलिक, नेवासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT